मायक्रोव्हेवमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करणं तुम्हाला आवडत असेल. आजकाल प्रत्येक घरातील किचनचा मायक्रोव्हेव हा अविभाज्य घटक बनलेला आहे. आपण त्यात जेवण गरम करतो. केक बनवतो. अशा अनेक गोष्टींसाठी मायक्रोव्हेवचा उपयोग करतो. पण मायक्रोव्हेवचा वापर आपल्या शरीरासाठी घातक आहे. मायक्रोव्हेवच्या वापराचे अनेक दुष्परीणाम आहेत ज्यांपासून सांभाळून राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. कोणते दुष्परिणाम आहेत मायक्रोव्हेवचे जाणून घेऊया?मायक्रोव्हेवमध्ये जेवण लवकर गरम होते. पण असे होत असताना जेवणातील पोषकद्रव्ये शरीरासाठी घातकद्रव्यांमध्ये बदलतात. मायक्रोव्हेव त्यांना' डेड फुड'मध्ये बदलते. मेडिकल डेली यात छापलेल्या रिपोर्टमध्ये डॉ. जोसेफ मॉरोकोला यांनी असं म्हटलं आहे.
तसेच या संशोधनात असेही समोर आले आहे की मायक्रोव्हेवच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गर्भवती महिलांनी जर या काळात मायक्रोव्हेवमधील अन्नाचे सेवन केले तर जन्माला येणाऱ्या मुलावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मायक्रोव्हेवमध्ये सतत अन्न गरम केल्याने कॅन्सर तसचे ब्लडप्रेशरचाही धोका संभवतो.मायक्रोव्हेवमध्ये प्लॅस्टीकच्या पिशवीत अन्न गरम केल्याने घातक द्रव्ये निर्माण होतात. मायक्रोव्हेवमध्ये गरम करताना जेवणात बीपीए, पॉथीलीन, बेन्जेन अशी विषारी द्रव्ये तयार होतात.