कोरोनाच्या माहामारीने जगभरात कहर केला आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कोरोनाची यशस्वी लस तयार करण्यात कोणत्याही देशाला यश मिळालेलं नाही. अश्यात एक संशोधन समोर आलं आहे. या संशोधनातून केलेल्या दाव्यानुसार एलईडी लाईट्सच्या वापराने कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं.
एका संशोधनानुसार युव्ही प्रकाश उत्सर्जक डायोड (यूवी-एलईडी) कोरोना व्हायरसला यशस्वीरित्या नष्ट करू शकतात. हे खूप स्वस्त सुद्धा असणार आहे. जर्नल ऑफ फोटो केमिस्ट्री अँड फोटो बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वैज्ञानिकांनी यूव्ही-एलईडी किरणोत्सर्गाच्या निर्जंतुकीकरण कार्यक्षमतेचे व्हायरसवरील वेगवेगळ्या नमुन्यांसह मूल्यांकन केले होते. त्यात कोरोना व्हायरसचाही समावेश होता.
इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठाच्या अमेरिकन अभ्यासांचे सह-लेखक हदास मामाने म्हणाले, "कोरोनाला नष्ट करण्यासाठी सध्या संपूर्ण जग प्रभावी उपाय शोधत आहे. बस, ट्रेन, स्पोर्ट्स हॉल किंवा विमान तळ स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी केमिकल्स वापरली जात आहेत. ज्यात वेळोवेळी मनुष्यबळ आवश्यक आहे.अभ्यासात असे दिसून आले आहे की, एलईडी बल्बवर आधारित निर्जंतुकीकरण यंत्रणा वेंटिलेशन सिस्टम आणि एअर कंडिशनरमध्ये स्थापित केल्या जाऊ शकतात.
सामान्यांना कोरोनाची लस कधी आणि कशी मिळणार? केंद्राने दिल्या लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स
ते पुढे म्हणाले की, "आम्हाला आढळले की अल्ट्राव्हायोलेट लाईट पसरवत असलेल्या एलईडी बल्बचा वापर करून कोरोनाला नष्ट करणं अगदी सोपे आहे. स्वस्त आणि अधिक सहज उपलब्ध एलईडी बल्ब वापरुन व्हायरस मारला जाऊ शकतो. ज्यामुळे कमी उर्जा वापरली जाते आणि यामध्ये साध्या बल्बसारखा पारा नसतो."
कोरोनानंतर 'या' देशात नव्या माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात
अशा एलईडी बल्बचा व्यापक वापर या संशोधनात परिणामकारक ठरल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. या एलईडी बल्बसना एयर कंडीशनिंग, वॅक्यूम आणि पाणी वाहतूकीसाठी लागत असलेल्या यंत्रांमध्ये ठेवता येऊ शकतं. पण घरांच्या अंतर्गत निर्जंतुकीकरण केलेल्या पृष्ठभागासाठी यूव्ही-एलईडी वापरणे खूप धोकादायक आहे.