केंद्र सरकारला ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून 12-17 वर्षांच्या मुलांचे कोरोना लसीकरण सुरु करायचे आहे. अधिकृत सुत्रांनुसार लठ्ठ, हृदय विकारासह अन्य आजार असलेल्या मुलांना सर्वात पहिली लस दिली जाणार आहे. पहिल्या राऊंडमध्ये अशा 20 ते 30 लाख मुलांना लस मिळणार आहे. केंद्र सरकारने हा प्लॅन झायडस कॅडिलाच्या ZyCov-D डीएनए लसीवर बनविण्यात आला आहे. ही एकमेव लस आहे जिला देशात मुलांसाठी आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. (Zydus Cadila's Covid vaccine ZyCoV-D launch likely in October.)
झायडसकडून आम्ही पुरवठा कधी सुरु होईल याची वाट पाहत आहोत. एकदा का तो सुरु झाला की आम्ही मुलांचे लसीकरण सुरु करू शकतो. या वर्षी ज्यांना को-मॉर्बिडिटीज आहेत त्यांना लस दिली जाईल. इतरांना पुढील वर्षी पहिल्या तिमाहीपासून लस देण्यास सुरुवात होईल.
पहिल्या टप्प्यात झायडस जवळपास 40 लाख डोस देणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळत जातील. यामुळे डिसेंबरपर्यंत कंपनी भारताला 4 ते 5 कोटी डोस देईल अशी अपेक्षा आहे. ZyCoV-D ही तीन डोसवाली लस आहे. यामुळे सरकार मार्च पर्यंत अन्य मुलांच्या लसीकरणाचा विचार करत आहे.
आणखी तीन लसींची चाचणी सुरुभारत बायोटेकच्या लहान मुलांवरील Covaxin ची देखील चाचणी सुरु आहे. क्लिनिकल ट्रायल पूर्ण होणार आहेत. या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली की ही लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनादेखील देता येणार आहे. बायोलॉजिकल ई आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लसीलाही नुकतीच चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.