वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसविरोधात (Corona Virus) लसीकरण मोहीम तीव्र झालेली असताना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार Dr. Anthony Fauci यांनी चिंतेत टाकणारे भाकित केले आहे. कोरोना व्हायरस प्रबळ होत असून लोकांना अनिश्चित काळासाठी दरवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागेल, असे म्हटले आहे. (people need booster dose every year; Dr. Anthony Fauci said)
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या तुलनेत आता आपल्याला जास्त माहिती मिळत आहे. अशी अनेक कारणे आहेत ज्या आधारे हे निर्णय घेतले जातात. लोकांना नियमित रुपाने वर्षातून एकदा जसा फ्ल्यूचे इंजेक्शन दिले जाते तसेच कोरोनाची लसही (Corona Vaccine) द्यावी लागेल, अशी शक्यता फाउची यांनी व्यक्त केली.
संशोधकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस द्यायची गरज आहे का, यावर संशोधन सुरु केले आहे. यामुळे फाउची यांना लोकांना बुस्टर डोस कधी दिला जाणार आणि किती सुरक्षा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फाउची यांनी सांगितले याबाबत काहीच कल्पना नाही. कोणालाच याची माहिती नाही. क्लिनिकल रिसर्च सुरु ठेवणे हाच यावरील पर्याय आहे. एफडीए लस बनविणाऱ्या फायझर आणि मॉडर्नासोबत मिळून काम करत आहे, कारण कमजोर इम्युनिटी असलेल्या नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळू शकेल.
रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या नागरिकांना हा बुस्टर डोस दिला जाईल. मात्र, तो घाई घाईने दिला जाईल याची शक्यता नाही. ज्या लोकांची कॅन्सर, ऑर्गन ट्रान्सप्लांट सारख्या आजारांमुळे प्रतिकार शक्ती कमी झाली आहे त्यांना तो दिला जाईल. सध्यातरी बुस्टर डोस देण्याची गरज आम्हाला वाटत नाही., असेही फाउची यांनी सांगितले.
परंतू फाउची यांनी म्हटले की एफडीए लवकरच या लोकांसाठी तिसरा डोस देण्याची परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. काही लोकांना त्या आधीच तिसरा डोस घेतला आहे. अशा लोकांनी तिसऱ्या डोसबाबत योग्य माहिती गोळा होत नाही तोवर वाट पहावी, असा सल्ला दिला. तिसरा डोस पहिल्या आणि दुसऱ्या डोस पेक्षा जास्त प्रतिकार शक्ती देतो, असे समोर आले आहे.