फ्लाइटमधून प्रवास करत असताना अनेकजण प्रवास लांबचा असला की, अल्कोहोलचं सेवन करतात. त्यांना वाटतं की, याने त्यांचा वेळही चांगला जाईल आणि त्यांना आरामही मिळेल. पण हेल्थ एक्सपर्टनुसार, विमानप्रवास करताना अल्कोहोलचं सेवन करणे आरोग्यासाठी चांगलं नाही.
डिहायड्रेशनचा धोका
जेव्हा तुम्ही विमान प्रवास करत असता तेव्हा आतील वातावरणामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. अनेक अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जर ८ ते १० तासांचा लांब विमान प्रवास करत असाल तर शरीरातील साधारण २ लिटर पाणी कमी होतं. अशात अल्कोहोलचं सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण अधिक कमी होतं. याने तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.
हॅंगओव्हर जाणवणे
एका रिसर्चनुसार, विमान प्रवासादरम्यान अल्कोहोलचा संबंध थिंक-ड्रिंक इफेक्टशी जोडलेला आहे. जास्त उंचीवर न पिताही हॅंगओव्हर जाणवू शकतो. जे लोक विमान प्रवासात अल्कोहोलचं सेवन करतात त्यांना त्याची नशा जास्त होतो.
पोट फुगण्याची समस्या
जेव्हा तुम्ही जास्त उंचीवर जाता तेव्हा फुफ्फुसांप्रमाणे पोटही फुगतं. याने तुम्हाला पोटदुखी होऊ शकते. अशात जेव्हा तुम्ही अल्कोहोलचं सेवन करता तेव्हा जास्त समस्या निर्माण होऊ शकते. डॉक्टरा सांगतात की, विमान प्रवास करताना पोटात गॅस निर्माण करणाऱ्या कोणत्याही पदार्थाचं किंवा पेयाचं सेवन करु नये.
मेंदुवरही होतो प्रभाव
अल्कोहोल मेंदुवरही प्रभाव करतं. याने निर्णय घेण्याची आणि एकाग्र होण्याची क्षमता कमजोर होते. अशात निराशा आणि संताप वाढतो. विमानात अल्कोहोलच्या सेवनामुळे तुमच्या व्यवहारातही बदल होऊ शकतो आणि याने तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
मीठ टाळा
जर तुम्ही विमानात अल्कोहोल सेवन करतही असाल तर त्यासोबत मीठ अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा. याने डिहायड्रेशन आणखी वाढू शकतं.