Healthy Liver: आजकाल जगभरात लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे लिव्हरसंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. लिव्हर डॅमेज झालं तर शरीरातील अनेक कामं रखडतात आणि इतरही अवयव खराब होऊ लागतात. कारण लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरद्वारे शरीरातील अनेक महत्वाची कामे केली जातात. अशात आपल्याच चुकांमुळे जर लिव्हर खराब झालं तर गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही भाज्यांच्या ज्यूसचं सेवन केलं तर तुम्हाला फायदा मिळू शकतो.
लिव्हरसाठी हेल्दी भाज्यांचे ज्यूस
गाजराचा ज्यूस
लिव्हरसाठी गाजराचा ज्यूस फार फायदेशीर मानला जातो. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन तत्व असतं जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए बनवतं. व्हिटॅमिन ए लिव्हरसाठी फायदेशीर असतं. याने लिव्हर डॅमेजचा धोका टाळता येतो. सोबतच पचन तंत्रही चांगलं राहतं आणि शरीर डिटॉक्स होतं.
बिटाचा ज्यूस
शरीर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे शरीरातील जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बिटाचा ज्यूस फार फायदेशीर ठरतो. यात पोटॅशिअम, फायबर, मॅगनीज, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात. तसेच बिटामध्ये हाय अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे रक्त शुद्ध करण्याचंही काम करतात. लिव्हरसाठी हा ज्यूस तर फार फायदेशीर आहे.
पालकाचा ज्यूस
अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असलेला पालकाचा ज्यूसही लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतो. अॅंटी-ऑक्सिडेंट्स लिव्हरचं नुकसान करणाऱ्या ऑक्सिडेटिव स्ट्रेसला दूर करतात. तेच शरीर आतून स्वच्छ करतात. पालकाच्या ज्यूस लिंबाचा रस आणि हलकं मीठ टाकलं तर टेस्टही चांगली होईल.
भोपळ्याचा ज्यूस
लिव्हर इन्फ्लामेशन दूर करण्यासाठी लौकी म्हणजे दुधी भोपळ्याचा ज्यूसही सेवन करू शकता. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरासाठी घातक फ्री रेडिकल्सना दूर करतो. लिव्हरचं आरोग्यही या ज्यूसने चांगलं राहतं.