तुम्ही शाकाहारी असाल कर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार शाकाहारी लोकांचे स्वास्थ्य हे मांसाहारी लोकांच्या तुलनेत जास्त उत्तम असत असा शोध लावण्यात आला आहे. शाकाहारी लोकांचे बायोमार्कर्स मांसाहारी लोकांच्या तुलनेत जास्त चांगले असते असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
बायोमार्कर म्हणजे काय?कोणत्याही रोगाची स्थीती आणि त्याच्यावरील केलेल्या उपचारांची प्रगती जाणून घेण्यासाठी बायोमार्कर टेस्ट केली जाते. यामध्ये पेशींचे स्वास्थ्य तपासले जाते. यात रक्तदाब व हृदयाचे ठोके याचे प्रमाण कळते. यामुळे आपण किती हेल्दी आहोत हे देखील समजते.
वैज्ञानिक काय म्हणाले?ग्लासगो युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार शाकाहारी लोकांचे स्वास्थ हे मांसाहारी लोकांपेक्षा जास्त चांगले असते असे बायोमार्कर टेस्टमुळे समोर आले आहे. त्यांनी १ लाख ७७ हजार जणांवर ही चाचणी केली. ज्यात ३७ ते ७३ वयोगटातील लोकांचा सहभाग होता. त्यानंतर पुढील निष्कर्ष समोर आले. शाकाराही लोकांना हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी असतो. मांसाहारी लोका्ंच्या तुलनेत शाकाहारी लोकांच्या शरीरातील लीवर जास्त सुदृढ असतेतसेच शाकाहारी लोकांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते.
शाकाहारी लोक कमी आजारी पडतातमांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोक कमी आजारी पडतात. याचे कारण कॉलेस्ट्रॉल आहे. मांसाहारी लोकांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. तसेच काहीप्रमाणात कॅन्सरचाही धोका असतो.