(Image Credit : V8 Juice UK)
सध्या अनेक लोक मांसाहार सोडून शाकाहाराकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत. तसेच अनेक लोक वेगन डाएटही घेत आहेत. अशातच एका संशोधनातून असं आलेल्या निष्कर्षांनुसार, शाकाहारी लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका अधिक असतो. म्हणजेच, शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका अधिक असतो. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांच्या तुलनेमध्ये स्ट्रोकचा धोका 20 टक्क्यांनी अधिक असतो. संशोधनामध्ये असं आढळून आलं की, शाकाहारी लोकांमध्ये रक्तस्त्रावी स्ट्रोक म्हणजेच, आंतरिक रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. हे संशोधन ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
इतर अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलं की, शाकाहारी लोकांमध्ये चांगलं कोलेस्ट्रॉलची कमतरता आणि काही व्हिटॅमिन्सची कमतरताही आढळून येते. विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे स्ट्रोकचा धोका आणखी वाढतो.
शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो. परंतु, वैज्ञानिकांच्या मते शाकाहारी लोकांमध्ये हृदय रोगाचा धोका कमी असतो. हार्ट अटॅक आि हार्ट फेलियरची शक्यताही शाकाहारी लोकांमध्ये कमी असते.
या संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या व्यक्ती माश्यांव्यतिरिक्त इतर कोणतेही मांसाहारी पदार्थ खात नाहीत. त्यांच्यामध्ये हृदयरोगाची शक्यता कमी असते. परंतु संशोधनामधून असा निष्कर्ष आला आहे की, शाकाहारी लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका सर्वाधिक असतो.
शाकाहारी लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी
संशोधनानुसार, शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांच्या तुलनेमध्ये हृदयरोगाचा धोका 22 टक्क्यांनी कमी होता. ज्या व्यक्ती फक्त मासे खातात त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा धोका 13 टक्के होता.
या संशोधनाबाबत संशोधकांचं म्हणणं आहे की, या संशोधनासाठी आणखी काही लोकांची निरिक्षणं नोंदवणं आवश्यक आहे. तसेच अनेक डाएट एक्सपर्ट्सनुसार, एका बॅलेन्स डाएटमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ असणं आवश्यक असतं.
हार्ट आणि स्ट्रोक होण्यासाठी इतरही अनेक कारण कारणीभूत ठरतात. एक्सरसाइज आणि लाइफस्टाइलचा हृदय रोग आणि स्ट्रोकवर थेट परिणाम होत असतो. (टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही त्यातून कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणं फायदेशीर ठरतं.)