नपुंसकता घालविण्यासाठी किंवा शरीर संबंधांवेळी व्हायग्राचे सेवन केले जाते. हे औषध डॉक्टरांना विचारून किंवा न विचारता देखील घेतले जाते. मात्र, हे औषध एवढे धोकादायक आहे की तुमची नजर कमी करू शकते किंवा कायमचे आंधळे करू शकते. एका नव्या संशोधनात मोठा खुलासा झाला आहे.
व्हायग्रासारख्या औषधांमध्ये एक असे रसायन आहे, जे डोळ्यांसाठी चांगले नाही. हे संशोधन JAMA Opthalomology मध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. संशोधकांनुसार व्हायग्रामध्ये फॉस्फोडाइस्टेरेस टाइप 5 इनहिबिटर्स असते जे डोळ्यांवर गंभीर परिणाम करते. एवढे की नजरही जाऊ शकते.
इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी व्हायग्रा, सियालिस, लेविट्रा आणि स्टेंड्रा सारख्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, यांच्या वापरानंतर तुम्हाला डोळ्यांचा विकार उद्भवू शकतो. वेगवेगळ्या औषधांचे वेगवेगळे परिणाम असतात. या औषधांच्या सेवनाने अनेक प्रकाराचे साईड इफेक्ट होत होते. सीरियस रेटिनल डिटैचमेंट आणि रेटिनल वैस्कुलर ऑक्लूजन सारखे आजार होऊ शकतात. यावर हे संशोधन करण्यात आले आहे.
संशोधकांनी यूएसमधील आरोग्य विम्यांतील दाव्यांची माहिती तपासली. यामध्ये 2.13 लाख लोकांना इरेक्टाइल डिसफंक्शनचे औषध घेण्याची सवय होती असे दिसले. त्यांची माहिती घेतली असता त्यांना डोळ्यांच्या एक ते तीन समस्या असल्याचे समोर आले. व्हायग्रासारखी औषधे न घेणार्यांच्या तुलनेत औषधे घेणाऱ्यांमध्ये आरडीचा धोका 1.5 टक्के वाढल्याचे दिसले. RVO चा धोका 2.5 टक्क्यांनी वाढतो. ION होण्याचे देखील चान्सेस दुप्पट होतात.
SRD च्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक डोळ्यांसमोर डाग तरंगताना दिसतात. समोर पाहताना प्रखर प्रकाशाचे डाग दिसतील. RVO मध्ये अचानक नजर जाऊ शकते. नजर कमजोर होऊ शकते. ION मध्ये दोन्ही डोळ्यांची एकाच झटक्यात नजर जाऊ शकते.