कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत (Corona Pandemic) भारतातील अनेक रुग्णांचा मृत्यू (Corona Death) हा फुफ्फुसामध्ये व्हायरस (Lungs infected by Corona Virus) पसरल्याने होत आहे. कोरोना व्हायरस खूप मोठ्या प्रमाणावर फुफ्फुसाला निकामी करतो. यामुळे त्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. डॉक्टरांनुसार कोरोनाचा नवीन म्युटंट खूपच खतरनाक आहे. याची लागण आधी गळ्यामध्ये होते. जर तुमच्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोनाचा थेट प्रसार हा फुफ्फुसापर्यंत होतो. तुमचे फिफ्फुस निरोगी आहे की नाही, किंवा ते किती ताकदवान आहे हे पाहणे गरजेचे आहे. (how to check health of your lungs in Corona Pandemic.)
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५ ते ६ दिवसांत फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्याचे दिसू लागते. अशावेळी तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाची कशी काळजी घ्यावी, फुफ्फुस कसे स्वस्थ आणि शक्तीशाली बनवावे याची माहिती असणे गरजेचे आहे. सामान्यपणे फुफ्फुसाची स्थिती जाणून घेण्यासाठी एक्स-रे काढावा लागतो. मात्र, आम्ही तुम्हाला घर बसल्या फुफ्फुसाची चाचणी कशी करावी याची माहिती देत आहोत.
देशातील टॉपच्या हॉस्पटपैकी एक झायडस हॉस्पिटलने नुकताच एक टेस्टिंग व्हिडीओ शेअर केला आहे. या अॅनिमेटेड व्हिडीओद्वारे फुफ्फुसाची टेस्ट कशी करावी याचा सोपा मार्ग दाखविण्य़ात आला आहे. झायडस हॉस्पिटलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
चला जाणून घेवूया कशी करायची फुफ्फुसाची टेस्ट...
या व्हिडीओमध्ये 1 ते 10 असे नंबर देण्यात आले आहेत. यामध्ये 2 नंबरला सामान्य फुफ्फुस म्हटले आहे. तर 5 नंबरला स्ट्राँग फुफ्फुस म्हटले आहे. तर त्यापेक्षा जास्त म्हणजेच 10 नंबरला सुपर लंग्स (फुफ्फुस) म्हटले आहे.
तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे....
- -व्हिडीओ प्ले करा आणि तुमचा श्वास रोखून धरा.
- - यावेळी गोल फिरणाऱ्या लाल रंगाच्या चेंडूकडे पहा.
- - लाल चेंडू कितीवेळा गोल फिरतो त्यावरून तुम्हाला नंबर दिला जाणार आहे.
- -श्वास सुटल्यानंतरचा नंबर नोंद करा.
तुम्ही जेवढे जास्त वेळ श्वास रोखून धराल तेवढा जास्त जास्त नंबर असेल. म्हणजेच तेवढेच शक्तीशाली तुमचे फुफ्फुस असणार आहे.
(सूचना: झायडस हॉस्पिटलद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओद्वारे केवळ फुफ्फुसाची चाचणी करण्याची पद्धत आहे. परंतू तुम्हाला कधीही जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करावा.)