टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली काही दिवसांपासून व्हेजिटेरीयन झाल्याने चर्चेत आहे. त्याने असे यासाठी केले कारण त्याला आपल्या खेळावर आणखी लक्ष केंद्रीत करण्यासाठी फिटनेसची काळजी घेणे सुरु केले आहे. आता त्याने आपल्या डाएटमध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. चला जाणून घेऊ विराटची डाएट...
खरंतर विराट कोहली हा वेगन झाला आहे. वेगन म्हणजे दुधापासून तयार कोणतेही प्रॉडक्ट तो आपल्या डाएटमध्ये सामिल करणार नाही. कोहलीने आपल्या डाएटमध्ये पूर्णपणे हिरव्या भाज्यांचा समावेश केला आहे. व्हेजिटेरीयन आणि वेगन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
वेगन डाएटमध्ये दुधापासून तयार कोणत्याही पदार्थांचं सेवन केलं जात नाही तर व्हेजिटेरीयनमध्ये या पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो. विराट कोहलीच्या डाएटमध्ये आता वेगवेगळे धान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. फळांच्या सेवनावरही तो जास्त भर देत आहे. सोया पनीरचाही यात समावेश करण्यात आला आहे. वेगन डाएटमध्ये जनावरांपासून तयार कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही.
वेगन डाएट पूर्णपणे फायबरने युक्त असते. याने पचनक्रिया अधिक मजबूत होते. विराटने वनस्पती तेलाचा वापर करणे सुरु केले आहे. त्याच्यासोबत आणखीही काही खेळाडूंनी या डाएटवर लक्ष केंद्रीत केलं आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स सुद्धा हा डाएट प्लॅन फॉलो करते.
वेगन डाएट फॉलो करणारे सांगतात की, हा डाएट प्लॅन माणसाला आनंदी ठेवण्यासाठी फार मदत करतो. व्यक्ती आपल्या सीमांना ओळखतो. आता विराट कोहली किती चिडका आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्याच्या डाएटचा त्याच्या रागावर किती प्रभाव पडतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.