- मयूर पठाडेकोणतीही स्त्री घ्या, ती एकवेळ आपल्या दिसण्याकडे लक्ष देईल, आपण ठीकठाक दिसतो की नाही याची काळजी घेईल, याला त्याला ब्युटी टिप्स विचारेल, चेहºयाच्या सौंदर्याची तर वारेमाप काळजी घेईल, त्यासाठी इंटरनेटपासून तर जो जे काही सांगेल, ते सारं भक्तिभावानं करील, पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सांगितलं, तर त्याकडे सहजपणे दुर्लक्ष करील.बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असाच प्रकार आपल्याला दिसून येतो. घरासाठी, परिवारासाठी झटत असताना त्या प्रत्येकासाठी सारं काही करतील, पण आरोग्याच्या बाबतीत स्वत:साठी काही करायचं म्हटलं, तर नेहमीच चालढकल केली जाते. नंतरच्या काळात केव्हा ना केव्हा याचा फटका त्यांना बसतोच.त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काही गोष्टी महिलांनी करायला हव्यातच. स्वत:च्या काही चाचण्या त्यांनी नियमितपणे करवून घ्यायला हव्यातच. आपल्या मुलांवर, नातवंडांवर कोणत्याही स्त्रीचा अपार जीव असतो. आपल्या नातवंडांबरोबर खेळायला, त्यांच्यासाठी काही करायलाही त्यांना फारच आवडतं. पण नातवंडांबरोबर खेळायचं असेल तर स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष द्यायलाच हवं.
नातवंडांना मांडीवर खेळवायचं ना? -मग महिलांनी या गोष्टी करायलाच हव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 5:38 PM
नियमित तपासणी करून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं.
ठळक मुद्देमहिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष नकोनियमित तपासण्या गरजेच्याचाळीशीनंतर अधिक काळजी गरजेचीदीर्घकाळ लुटता येईल आयुष्याचा आनंद