Remedies For Vitamin A: शरीरात जेव्हाही काही बदल होतात किंवा होणार असतील तर शरीर आपल्याला काही संकेत देतं. पण अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने शरीराकडून मिळणाऱ्या या संकेतांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शरीरात जर व्हिटॅमिन ए ची कमतरता जाणवली तर चेहऱ्यावर पिंपल्स, डाग येतील आणि तुमची त्वचा रखरखीत होईल. तसंच डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागते आणि काम करताना लवकर थकवा जाणवतो. या प्रभाव तुमच्या नखांवर आणि केसांवरही दिसू लागतो.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या
शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता झाल्यावर सर्वात जास्त प्रभाव डोळ्यांवर पडतो. ज्यात रात आंधळेपणा, डोळ्याच्या पांढऱ्या भागात डाग आणि कॉर्निया कोरड्या होऊ लागतात. जर वेळीच यावर काही उपचार केले नाही तर तुम्ही नेहमीसाठी अंध होऊ शकता. सोबतच व्हिटॅमिन ए ची कमतरता झाली तर त्वचा कोरडी होते, घशात संक्रमण होतं, हाडे कमजोर होऊ लागतात आणि महिलांना गर्भधारणा करण्यात समस्या येते.
व्हिटॅमिन ए ची कमतरता कशी भरून काढायची?
शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही हेल्दी फूडचं सेवन केलं पाहिज. व्हिटॅमिन ए ची कमतरता झाल्यावर तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. कारण यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं. त्यासोबतच तुम्ही अंडी, मोड आलेले कडधान्य यांचंही सेवन करू शकता. दुधातही व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. तसेच तुम्ही गाजर, पिवळ्या किंवा केशरी भाज्या, पालक, रताळे, पपई, दही, सोयाबीन आणि इतरही पालेभाज्या खाऊ शकता.