कमी वयात केस पांढरे होण्याचा सामना आजकाल 25 ते 30 वयोगटातील तरुणांनाही करावा लागत आहे. काही वेळा यामागे अनुवांशिकता, हे कारण असू शकते. मात्र, आपली बिघडलेली जीवनशैली आणि असकस आहार घेण्याची सवय, हेदेखील याला जबाबदार धरले जाते. पण शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकस आहाराच्या मदतीने आपण या समस्येवर मात करू शकतो. जर आपण व्यवस्थित लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल, की एका विशिष्ट व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होत आहेत.
व्हिटॅमिन बीची कमतरता तर नाही?शरिरात व्हिटॅमीन 'बी'ची (Vitamin B) कमतरता झाल्यास, याचा परिणाम थेट आपल्या शरिरावर होतो. आपल्या आहारात व्हिटामिन बीची कमतरता असेल, तर कमी वयात केवळ केस पांढरेच होत नाही, तर हेयर फॉलची समस्याही होते. व्हिटॅमिन बी हा आपल्या शरिरासाठी अत्यंत पोषक घटक आहे. जे सेल मेटॅबॉलिझम (Cell Metabolism) आणि रेड ब्लड सेल्सच्या (Red Blood Cells) सिंथेसिसमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते.
डेली डायटमध्ये सामील करा व्हिटॅमिन बी युक्त फूड्स -जरी कमी वयात आपलेही केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर, आपण लगेचच आपल्या आहारात व्हिटॅमिन बी (Vitamin B), व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी12 चा समावेश करायला हवा. आपण डेअरी प्रोडक्ट्स घेण्यावर भर दिला, तर या न्यूट्रिएंट्सचा गरज पूर्ण केली जाऊ शकते.
विटॅमिन बी मिळवण्यासाठी या गोष्टींचा करू शकता आहारात समावेश? "सोयाबीन, दही, ओट्स, दूध, पनीर, ब्रोकली, हिरव्या पाले भाज्या आदी..."
व्हिटॅमिन बीचे प्रकारव्हिटॅमिन B1 - थायमीन(Thiamine)व्हिटॅमिन B2 - रिबोफ्लेविन (Riboflavin)व्हिटॅमिन B3 - नायसिन (Niacin)व्हिटॅमिन B5 - पेंटोथेनिक एसिड (Pantothenic Acid)व्हिटॅमिन B7 - बायोटिन (Biotin)व्हिटॅमिन B9 - फोलेट (Folate)व्हिटॅमिन B12 - कोबालामिन (Cobalamin)
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारीत आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. लोकमत याची पुष्टी करत नाही.)