अनेक जणांना रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे थकवा येण्याची समस्या उद्भवू लागते. अनेकांना झोप, शारिरीक काम, आहार, तणावामुळेही सतत थकवा येत असतो. थकवा येणं हा एखाद्या रोगाचा संकेतही असू शकतो. व्हिटॅमिन बी12ची कमतरता हे थकवा येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे शरीरात या व्हिटिमिनची कमतरता असल्यास त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. जाणून घ्या शरीरातील व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेची काही लक्षणं, आजार अन् उपाय -
व्हिटॅमिन बी 12 चं कार्यशरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्याचं काम व्हिटॅमीन बी 12 करतं. चाळिशीनंतर शरीरात व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. दीर्घकाळासाठी काही औषधांचं सेवन केल्यास शरीरातील बी 12 च्या क्षमतेवर परिणाम होतो. भारतातील 60 ते 70 टक्के नागरिकांमध्ये व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्याचं नुकतंच एका संशोधनात समोर आलं आहे.
व्हिटॅमिन बी 12 कमी असल्यास या आजारांचा सामना करावा लागतो
- मेगाब्लॉस्टिक अॅनिमिया
- न्यूरोलॉजिकल दोष
- तीव्र थकवा
- गर्भधारणेची गुंतागुंत
- हृदयाशी संबधित समस्या
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अन्य समस्या
- तुमची त्वचा पिवळी पडणे- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पिवळी पडू लागते कारण रक्तातल्या लाल पेशी कमी होतात.
- जीभ लाल होणे- तुमची जीभ लाल होत असेल तर हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण आहे.
- तोंड येणे किंवा तोंडात व्रण उठणे- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुमच्या तोंडात व्रण उठतात व सुजही येते.
- चालताना त्रास होणे- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला चालताना त्रास होऊ शकतो कारण, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता तुमच्या नर्व्हस सिस्टिमला धोका पोहोचवते
- दृष्टीदोष- तुम्हाला धुरकट दिसणं हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं लक्षण आहे. हे देखील नर्व्हस सिस्टिम डॅमेज झाल्यामुळे होतं.
व्हिटॅमिन बी 12 वाढवण्याचे उपाय
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून व्हिटॅमीन बी 12 मिळण्यास मदत होते. मशरुम, बदाम किंवा सोयाबीनचं दूध तसचं मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा.
- शरीरामध्ये व्हिटॅमीन बी 12 चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे.
- व्हिटॅमीन बी 12 शोषण चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
- भरपूर पाणी प्यायल्याने व्हिटॅमीन बी 12 चं शरीरात चांगल्या प्रकारे शोषण होण्यास मदत होते.