Vitamin B12 Deficiency Disease: व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी फार आवश्यक असतात. कारण यांनी आरोग्य चांगलं राहतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, व्हिटॅमिन बी 12 चं शरीरासाठी किती महत्व आहे. जर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली तर तुम्हाला महागात पडू शकतं.
शरीरात या पोषक तत्वाचं काम डीएनए बनवणं आणि फॉलिक अॅसिडला अब्जॉर्ब करणं आहे. त्यामुळे आपण रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्याद्वारे हे व्हिटॅमिन मिळेल आणि अनेक आजारांचा धोका टळेल. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यावर कोणत्या समस्या होतात यावर एक नजर मारूया.
1) विसरण्याची समस्या
जे लोक व्हिटॅमिन बी12 असलेल्या आहाराचं जास्त सेवन करत नाहीत, त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहत नाही आणि अनेक मानसिक आजारांचा धोका वाढतो. अनेक लोकांची स्मरणशक्ती कमजोर होते. ते छोट्या छोट्या गोष्टी विसरू लागतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ देऊ नका.
2) डोळ्यांची दृष्टी जाते
जर व्हिटॅमिन बी 12 असलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर याचा तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. सामान्यपणे डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे, धुसर दिसणे आणि लहान अक्षर वाचताना डोळे दुखणं अशा समस्या होतात.
3) रक्ताची कमतरता
जर व्हिटॅमिन बी12 ची शरीरात कमतरता झाली तर एनीमियाचे शिकार होऊ शकता. कारण या स्थितीत आपल्या शरीरातील ब्लड सेल्स तयार होण्याची प्रक्रिया स्लो होतो. ज्यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.
4) हाडांची समस्या
जर तुम्हाला हाडांमध्ये वेदना होत असेल तर समजून घ्या की, शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली आहे. अशात लगेच ज्यातून व्हिटॅमिन बी12 मिळेल असे पदार्थ खाणं सुरू करा. याने वेदना कमी होईल.