Anti ageing juice: लोक वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पितात आणि या ज्यूस आरोग्याला अनेक फायदेही होतात. ज्यूसमुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. ज्यूस तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे यावर अवलंबून असतं की, ज्यूस तयार करण्यासाठी कोणत्या भाज्या आणि फळांचा वापर करता.
ज्यूस पिण्याचे फायदे
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशननुसार, काही भाज्या किंवा फळांच्या ज्यूसचं सेवन करणं खूप फायदेशीर असतं. ज्यूससाठी आम्ही हाय अॅंटी-ऑक्सिडेंट् आणि व्हिटॅमिन्सयुक्त फळ-भाज्यांची निवड केली पाहिजे. जेणेकरून आवश्यक पोषक तत्व मिळावेत.
पत्ता कोबी ज्यूस
पत्ता कोबीची भाजी तुम्ही अनेकदा खात असाल. मात्र, याच्या ज्यूसमध्येही आरोग्यासाठी आवश्यक अनेक तत्व असतात. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, ज्याने इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत मिळते. यात एंथोसायनिन आणि फाइटोन्यूट्रिएंट्स नावाचे गुण असतात. या अॅंटी-ऑक्सिडेंट्सने शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया स्लो होते.
काकडीचा ज्यूस
व्हिटॅमिन के ची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीच्या ज्यूसचं सेवन करणं फायदेशीर असतं. काकडीने शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. काकडीच्या ज्यूसचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता. जसे की, पदीना आणि लिंबूचा रस मिक्स करून ज्यूस बनवणे.
संत्र्याचा ज्यूस
संत्र्याच्या ज्यूसमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया स्लो होते. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, ज्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि इन्फेक्शनपासून बचावही होतो.
द्राक्षाचा ज्यूस
द्राक्षाच्या ज्यूसमध्ये रिस्वेराट्रोलसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया स्लो होते. या ज्यूने हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं. ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि हृदयरोगांचा धोका टाळला जातो. तसेच यात फायबर भरपूर असल्याने पचनक्रियाही चांगली राहते.