शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फक्त रोगप्रतिकारकशक्तीसाठीच नाही व्हिटॅमीन सी, मानसिक समस्याही दूर करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 5:44 PM

खाली दिलेल्या आहार आणि फळांमधून विटामिन 'सी' आपल्या शरीरास मिळते. जाणून घ्या त्या फळं आणि भाज्यांविषयी. विटामीन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबत मानसिक समस्याही दूर करते.

विटामिन 'सी' मुळे आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीचे कार्य सुरळीत सुरू राहते. याव्यतीरिक्त विटामिन 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, जास्तीच्या लोहाचा शरीराला पुरवठा करण्यासाठी, जखम लवकर भरून येण्यासाठी, तोंडाच्या आरोग्यासोबतच हाडांसाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे विटामिन 'सी 'उपलब्ध असणा-या भाज्या आणि फळांचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या आहार आणि फळांमधून विटामिन 'सी' आपल्या शरीरास मिळते. जाणून घ्या त्या फळं आणि भाज्यांविषयी. विटामीन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबत मानसिक समस्याही दूर करते.

लिंबूलिंबू हा विटामिन सी चा सर्वात मोठा आणि चांगला घटक मानला जातो. याच कारणामुळे बहुतांश लोक जेवनानंतर लिंबू पाण्यात पिळून पितात. विटामिन सी मिळवण्यासाठी तुम्ही लिंबूचा अनेक प्रकारे रोजच्या आहारात समावेश करू शकता. काही लोक लिंबू सरबत करून याचे सेवन करतात. तर काही लोक डाळ-खिचडी मध्ये लिंबाचा रस पिळून जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच विटामिन सी मिळवतात. लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते. या फळांतून ‘क’ जीवनसत्व व्यवस्थित मिळण्यासाठी ती ताज्या व कच्च्या स्वरूपात खाल्ली पाहिजेत. 'क' जीवनसत्व हे उष्णतेने लगेच नाश पावत असल्यामुळे शिजवलेल्या अन्नातून ते जास्त प्रमाणात मिळत नाही. म्हणूनच वरण, भात, तूप, मीठ व लिंबू हा पारंपरिक आहारातून ते जीवनसत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. लिंबाचे लोणचे हा प्रकार मात्र ‘क’ जीवनसत्व अगदी छान टिकवून ठेवतो.

पालकपालकच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पालकच्या भाजीला हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने एक गुणकारी पालेभाजी मानली जाते. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण देखील आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. पालकात जे गुण आढळून आले आहे ते सामान्य भाज्यांमध्ये सापडत नाही. हेच कारण आहे की पालक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी, सर्वसुलभ आणि स्वस्त आहे. पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ जीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी देखील ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे. पालक दुधाला देखील पर्य़ाय ठरू शकते. ज्यांना दुध आवडत नाही त्यानी पालकपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ करून खावेत.पालक-पनीर, पालक-पुरी, आलू-पालक, पालक-पकोडे अशा निरनिराळ्या प्रकारे आहारात या गुणकारी भाजीचा समावेश करता येतो. हाडे बळकट करण्यासाठी या भाजीचा उपयोग होऊ शकतो. अनेक जीवनसत्त्वे व क्षारांनी परिपूर्ण अशी ही भाजी लहान-थोरांना पथ्यकर आहे. पालक खाल्ल्याने मेंदूच्या कार्यशक्‍तीमध्ये नियमितता येत असून व्हिटॅमिन “क’मुळे हाडांचा ठिसूळपणा घटत असल्याचेही आढळले आहे.

संत्रीसंत्री प्रत्येक ऋतूत मिळणारे फळ आहे. भरपूर विटामिन सी असलेल्या पदार्थांपैकी संत्री हे एक फळ महत्वाचे मानले जाते. त्वचा उजळण्यासाठी आणि सी जीवसत्व मिळवण्यासाठी संत्री खूप लाभदायक मानली जातात. संत्री हे फळ चवीने आंबट गोड स्वरूपाचे असते. या फळाचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो त्यामुळे त्याला 'नारंगी' या देखील नावाने ओळखले जाते. दररोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने शरीराचा तणाव व थकवा दूर होतो. संत्रीच्या दररोज सेवनाने दात आणि हिरड्या सुदृढ राहण्यासोबतच मूळव्याधही बरा होण्यास मदत होते. संत्र्यांचे दररोज सेवन केल्याने केसांची चमक वाढते आणि केस लवकर वाढतात. संत्रीमध्ये असणारे फोलेट आणि फोलिक एसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. संत्र्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो संत्रीच्या खाल्ल्याने भूकही वाढण्यास मदत होते. संत्र्याचा ज्युस पिण्यासोबतच तुम्ही संत्र्याची बर्फी, संत्र्याची कॅंडी आणि संत्र्याचा जॅम करूनही खाऊ शकता.

कीवीकीवी हे असं फळ आहे जे आपल्याला प्रत्येक ऋतुमध्ये सहजपणे मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच कीवी आपल्या शरीरास ब-याच प्रकारचे पोषक तत्वही देते. विटामिन सी पुरवणा-या ताज्या फळांमध्ये कीवीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कीवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही कीवीचा फायदा होतो. कीवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे. कीवी फळ खाल्ल्यानं मधुमेह असलेल्या रूग्नांसाठी ते फायदेशीर ठरते. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो. फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकीच या फळाची साल सुद्धा गुणकारी असते. पचनक्रिया सुधारण्यासही कीवी गुणकारी ठरते. कीवीचा उपयोग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो. त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी देखील कीवी उपयुक्त ठरतं. तसंच त्यात अॅंटीएजिंग गुणधर्मही असल्यामुळे किवीचा फेसपॅक त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो.

पेरूपेरू तर लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. सहसा लोक पेरूला चटणी-मीठ लावून खातात. पेरूमध्ये जवळ जवळ १२६ मिलीग्राम विटामिन सी चा समावेश असतो. तुम्ही पेरूचे सलाडच्या स्वरूपात किंवा स्मुदी बनवूनही सेवन करू शकता. इतकंच नाही तर पेरूमधील मॅग्नेशिअमचे प्रमाण रक्ताभिसरणाचे कार्य संतुलित राखण्यासही मदत करते. 

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न