शरिरातील प्रक्रियांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन 'सी' हे अत्यंत लाभदायक आहे. व्हिटॅमिन 'सी' म्हणजे Ascorbic acid होय. हे आंबट फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. मुख्यतः आवळा, लिंबू, संत्री यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. शरिरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी 'सी' व्हिटॅमिन फायदेशीर ठरते.
- व्हिटॅमिन 'सी'मध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. प्रदूषण, प्रखर सुर्यकिरणांमुळे त्वचेची झालेली हानी भरून काढण्याचे काम व्हिटॅमिन 'सी' करते.
- कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासून शरिराचे रक्षण करण्याच काम 'सी' व्हिटॅमिन करते. हे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम व्हिटॅमिन 'सी' करते.
- व्हिटॅमिन 'सी' शरिरातील रक्तवाहिन्यांना मजबूत करण्याचे काम करते.
- शरिरातील वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवण्याचे कामही 'सी' व्हिटॅमिन करते.
- शरिराचे सांधे जोडण्याचे काम करणाऱ्या कोलाजेन नामक द्रव्य तयार करण्याचे कामही व्हिटॅमिन 'सी' करते.
व्हिटॅमिन 'सी'चे स्त्रोत -
- आंबट फळे म्हणजेच, आवळा, लिंबू, संत्री त्याचप्रमाणे टॉमेटो, केळी, सफरचंद यांमध्ये व्हिटॅमिन 'सी'चे मुबलक प्रमाणात असते.
- पुदीना, मुळ्याची पाने, पालक, कोथिंबीर, मनुके, दूध यांच्या सेवनानेही शरिराला व्हिटॅमिन 'सी' मिळते.
- डाळींमध्येही व्हिटॅमिन 'सी' मोठ्या प्रमाणात आढळते. कच्च्या डाळींमध्ये व्हिटमिन 'सी' नसते. परंतु डाळी भिजवून खाल्याने मोठ्या प्रामाणावर 'सी' व्हिटॅमिन मिळते.