व्हिटमिन -K हे आपल्या शरीरातील रक्तासाठी फायदेशीर असतं. कारण हे व्हिटॅमिन शरीरातील रक्त घट्ट होऊ देत नाही. त्यामुळे आपला ब्लड फ्लो योग्य राहतो आणि शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लड क्लॉटिंगचा धोकाही राहत नाही. त्यामुळे चला जाणून घेऊन व्हिटमिन -K कसं मिळवता येईल आणि याचे फायदे काय होतात.
कसं काम करतं व्हिटॅमिन -K?
आपल्या शरीरात कुठेही जखम झाली तर रक्त येऊ लागतं. काही वेळाने त्या जखमेवर रक्ताचा एक थर जमा होतो आणि रक्त सुकून जातं. हे रक्तातील प्रोथोम्बिन नावाच्या प्रोटीनमुळे होतं. या प्रोटीनच्या निर्माणासाठी शरीराला व्हिटॅमिन K ची गरज असते. म्हणजे व्हिटॅमिन K दो प्रकारे काम करतं. एक म्हणजे शरीरातील रक्त गोठू देत नाही आणि दुसरं म्हणजे शरीराबाहेर रक्त वाहू देत नाही.
हाडांसाठीही फायदेशीर व्हिटॅमिन K
असं अजिबात नाही की, व्हिटॅमिन K केवळ रक्तासाठीच फायदेशीर आहे. तर व्हिटॅमिन K मुळे हाडेही मजबूत होतात. याने हाडांचं मेकॅनिजम ठिक होतं. त्यामुळे हाडे सॉफ्ट होत नाही आणि कमजोरही होत नाहीत. अशात फ्रॅक्चरचा धोका कमी राहतो.
वरदान आहे व्हिटॅमिन K
शरीरात व्हिटॅमिन K ची कमतरता सामान्य बाब नाही. याची खासियत म्हणजे फार रेअर केसमध्ये या व्हिटॅमिनची शरीरात कमतरता होते, पण जेव्हा होते तेव्हा हे कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराचं कारण ठरतं. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्ताच्या गाठी तयार होणं वाढतं. याने जीवाला धोका होऊ शकतो. तसेच रक्त पातळ होऊ लागतं. अशात जखम झाली किंवा ब्रेन हॅमरेज झाल्यावर रक्त अधिक वाहू लागतं.
शरीरात नाही होत तयार
आपल्या शरीरासाठी जास्तीत जास्त आवश्यक गोष्टी निर्मित करण्याची क्षमता शरीरातच असते. पण व्हिटॅमिन K मिळवल्याशिवाय आपलं शरीर प्रोथोम्बिनची निर्मिती करू शकत नाही. जे शरीरातून निघणाऱ्या रक्ताच्या क्लोटिंगसाठी गरजेचं आहे. त्यासाठी नियमितपणे हिरव्या भाज्या, दूध, ड्राय फ्रूट्स आणि फळांचा आहारात समावेश करावा.
कुणी करू नये वापर
ज्या लोकांना रक्त पातळ असण्याची समस्या किंवा आजार असतो त्यांनी रक्त व्हिटॅमिन K ने भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्याकडून हे जाणून घेतलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय नाही.