संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल अशी शक्यता अनेक देशांनी तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी अनेकांची मुद्दाम संक्रमित होण्याचीही तयारी आहे. फायनेंशियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार अशा पद्धतीच्या क्लिनिकल ट्रायलचे आयोजन करणारा ब्रिटेन हा पहिला देश आहे. या ठिकाणी स्वयंसेवकांना आधी संक्रमित केलं जाणार आहे. अशा प्रोजेक्टचं आयोजन करण्यामागे लसीची क्षमता तपासून पाहणं हे उद्दिष्ट आहे.
या प्रोजेक्टला 'चॅलेन्ज ट्रायल' अस नाव देण्यात आलं आहे. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला हे ट्रायल्स सुरू होतील अशी आशा व्यक्त केली आहे. हे ट्रायल लंडनमध्ये होणार आहे. यात जवळपास २००० स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. ब्रिटेननं दिलेल्या माहितीनुसार भागीदारांसोबत मिळून हे ह्यूमन ट्रायल केलं जाणार आहे. एका सरकारी प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीच्या माध्यमातून लस किती परिणामकारक ठरते हे पाहिलं जाणार आहे. ही माहामारी लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी व्हायरसचा प्रसार थांबवण्याच्या विविध पद्धतींवर जोर दिला जात आहे.
ह्यूमन चॅलेन्ज ट्रायलमध्ये स्वयंसेवकांना मुद्दाम व्हायरसच्या संपर्कात आणलं जातं. जेणेकरून चाचणी आणि आजाराबाबत माहिती मिळवता येऊ शकेल. 1Day Sooner यांनी आपल्या बेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या पद्धतीचा वापर इन्फ्लूएंजा, मलेरिया, टाइफाइड, डेंग्यु या आजारांसाठी करण्यात आला होता. आता कोरोनाची लस कितपत परिणामकारक ठरते हे पाहण्यासाठी तपासणी केली जाणार आहे. फाइनेंशियल टाइम्स ने दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून यासाठी फंडींग दिलं जात आहे.
1Day Sooner च्या माहितीनुसार जास्तीत जास्त स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यासाठी पब्लिक फंडींगची सुरूवात केली जाणार आहे. तसंच हे ट्रायल सुरू करण्यासाठी ब्रिटिश सरकारचे आभारही मानले आहेत. या ट्रायलमुळे जगभरातील लोकांना समान स्वरुपात लसी उपलब्ध होण्यास मदत होईल. काही महिन्यांआधी यावर चर्चा करण्यात आली होती. जर लसीच्या शेवटच्या ट्रायलसाठी रुग्ण उपलब्ध झाले नाही तर निरोगी स्वयंसेवकांना कोरोना व्हायरसनं संक्रमित करून ट्रायल केलं जाणार असं ठरवण्यात आलं होतं.
फायनेंशियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार स्वयंसेवकांना आधी लस दिली जाईल त्यानंतर कोरोना व्हायरसनं संक्रमित केलं जाणार आहे. या चाचणीत वापरात असलेल्या लसीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. एक्स्ट्राजेनेका, सनोफी यांनी रॉयर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या लसीच्या चाचणीतील स्वयंसेवक या प्रोजेक्टचा भाग नाहीत.
सिरम इन्स्टिट्यूटने बनवली CDX-005 नेझल स्प्रे कोरोना लस
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतील कंपनी कोडाजेनिक्ससह लस तयार करण्याचा करार केला होता. ही लस तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस नाकाद्वारे दिली जाते. कोडाजेनिक्सकडून एक निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनातून याबाबत माहिती देण्यात आली होती. या लसीचे नाव CDX-005 आहे. या लसीच्या चाचणीसाठी प्राण्यांवर प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले होते. या वर्षाच्या शेवटापर्यंत UK मध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार प्री क्लिनिकल अभ्यासात या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते.
कोडाजेनिक्सचे सीईओ जे रॉबर्ट कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सिरम इंन्स्टिट्यूटची टेक्निक आणि आर्थिक मदत पाहता या वर्षीच्या शेवटापर्यंत लसीच्या वैद्यकिय चाचण्या पूर्ण होतील अशी आशा आम्हाला आहे. तसंच लसीवर वेगानं काम सुरू होऊ शकतं. ही लस तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला होता. व्हायरसचं म्यूटेशन पाहता SARS-CoV-2 जीनोम्सना रिकोड करतो. या लसीमुळे रोगाशी लढण्याची क्षमता नसतानाही शरीरात मजबूत टी सेल्स आणि एंटीबॉडी तयार करता येतात.''
इतर लसींपेक्षा ही लस खूपच वेगळी आहे. सध्या जी लस तयार केली जात आहे ती एडीनोव्हायरसवर आधारित आहे. त्यामुळे स्पाईक प्रोटिन्सना टार्गेट करता येऊ शकतं. CDX-005 ही लस इंजेक्शनच्याऐवजी नाकाद्वारे दिली जाणार आहे. ही लस रुग्णांसाठी परिणामकारक आणि सुरक्षित ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
हे पण वाचा-
खुशखबर! जॉनसन अॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार
वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान
दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...
पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय