- मयूर पठाडेकोणत्याही गोेष्टीची आवड हळूहळू लागते, पण एकदा का अशी आवड लागली की मग ती बºयाचदा आयुष्यभर टिकते. तेच व्यायामाचंही आहे. अनेकांना व्यायाम आवडत नाही, पण एकदा का त्याची सवय लागली, त्यातली गंमत कळली आणि त्याचे परिणाम दिसायला लागले की अनेक जण व्यायामाकडे गांभीर्यानं पाहायला लागतात. अनेकांच्या या आवडीचं रुपांतर तर ‘नशेत’ व्हायला लागतं. व्यायामाचीच नशा त्यांना चढते आणि रोज इतका व्यायाम ते करायला लागतात, की त्यांचं त्यांनाच त्याविषयी भान राहात नाही. पण अजिबात व्यायाम न करणं जसं चुकीचं तसंच अति व्यायामही आपल्या आरोग्याला घातकच. पण अनेकांमध्ये आजकाल व्यायाम घातक पातळीपर्यंत गेलेला आपल्याला दिसतो. कुठे थांबायचं तेच त्यांना काळत नाही.पण कसं समजायचं आपण अति व्यायाम करतोय ते?..त्याचीही लक्षणं आहेत आणि आपलं शरीरच ते सांगतं.शारीरिक तंदुरुस्तीसाठी गरजेपेक्षा जास्त व्यायाम म्हणजे अति व्यायाम.ते कसं ओळखायचं?१- डोकेदुखी२- निद्रानाश३- हृदयाचे ठोके जलद गतीनं पडणं.४- मसल्स आणि जॉइंट्स दुखणं.५- एनर्जी वाढण्याऐवजी कमी होणं.६- भूक कमी होणं.७- परफॉर्मन्स कमी होणं.८- रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं.वर दिलेली आठ लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील तर नक्की समजा, तुम्ही अति व्यायाम करताय आणि तुम्हाला व्यायामाची नशा चढलीय. अर्थातच तुमच्या तब्येतीसाठी ते अतिशय घातक आहे.अति व्यायामाचे तरुणी, महिलांवरही दुष्परिणाम होतातच. त्याविषयी पुढच्या भागात...
थोडं थांबा, अतिरेकी व्यायामाची ‘नशा’ तर तुम्हाला चढलेली नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 5:47 PM
आपण अति व्यायाम करतोय हे ओळखण्याची आठ लक्षणं..
ठळक मुद्देअति व्यायामानं हृदयाचे ठोके जलद गतीनं पडतात.मसल्स आणि जॉइंट्सची दुखणी वाढतात.एनर्जी वाढण्याऐवजी कमी होते.