अक्रोड खा अन् टेन्शन पळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 5:33 PM
अक्रोड खाण्याने होणाºया अनेक फायदे आपणास माहित आहेत, मात्र अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे तरुण व हेल्दी पुरुषांमधील बराचसा तणाव कमी होतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
अक्रोड खाण्याने होणाºया अनेक फायदे आपणास माहित आहेत, मात्र अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे तरुण व हेल्दी पुरुषांमधील बराचसा तणाव कमी होतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्याच बरोबर हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने २८ टक्के तरुण व हेल्दी पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.मात्र अक्रोडच्या सेवनामुळे महिलांच्या तणावग्रस्त परिस्थितीत काही बदल झाला नसल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.