Health Tips : जास्तीत जास्त लोक काय करतात, सकाळी उठतात, नाश्ता करतात आणि आपल्या कामावर निघून जातात. कामाहून परत आल्यावर जेवण करतात आणि त्यानंतर झोपतात. हीच जास्तीत जास्त लोकांची लाइफस्टााईल असते. जर तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण रात्री जेवणानंतर लगेच झोपायला जात असाल तर लठ्ठपणासहीत अनेक आजारांचे शिकार होऊ शकता.
देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्यानुसार, जेवणानंतर आपण फिरायला हवं. याने शरीराचा प्रत्येक अवयव आणि मांसपेशी योग्य प्रकारे काम करतात. याने ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे काम करतं. टाइप २ डायबिटीसच्या रूग्णांनीही जेवण केल्यावर थोडावेळी शतपावली करावी. त्याने ब्लड शुगर कमी होते.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रात्री जेवण केल्यावर कमीत कमी २० मिनिटे चाललं पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ चालू शकता. पण हे लक्षात ठेवा की, तुम्ही जेवण केल्यावर एक तासाच्या आतच चालायचं आहे.वजन कमी होतं - हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर २० मिनिटे पायी चाललात तर लठ्ठपणाचा धोका बराच कमी होतो. कारण पायी चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासाठी तुमचं मेटाबॉलिज्म योग्य असावं लागतं.
इम्यूनिटी वाढते
रात्री जेवण केल्यावर चालल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत मिळते. कारण याने तुमच्या इम्यून सिस्टीममधून टॉक्सिन बाहेर निघतं. पायी चालणं आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगलं असतं.
ब्लड शुगर नियंत्रित
जेवण केल्यावर काही वेळाने शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढणं सुरू होतं. जेव्हा तुम्ही रात्री जेवण केल्यावर फिरता, तेव्हा याने ब्लड शुगर नियंत्रित राहतं. याने हायपरग्लेसेमियाचा धोकाही कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. याने सूजन कमी होते, जुलाब होण्याचा धोका टळतो आणि पोटासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते.