शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मेडिक्लेम काढायचाय?, काय करावं लागेल? वाचा संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 9:06 AM

Mediclaim Policy : तहान लागल्यावर विहीर खोदणे, याच अनुभवातून आपण अनेकदा जातो. पण आरोग्याच्या बाबतीत असे करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखे आहे.

पुष्कर कुलकर्णीतहान लागल्यावर विहीर खोदणे, याच अनुभवातून आपण अनेकदा जातो. पण आरोग्याच्या बाबतीत असे करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी काढणे महत्त्वाचे आहे. मेडिक्लेम पॉलिसीविषयी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात अनभिज्ञता निदर्शनास येते. या सर्व पार्श्वभूमीवर मेडिक्लेम काढायचा असेल तर आपली गरज किती, मेडिक्लेम पॉलिसी काढावी कशी, यासंदर्भात आपण जाणून घेऊ या...

१. विविध कंपन्यांच्या मेडिक्लेम पॉलिसीसंदर्भात अधिकृत एजंट मार्फत माहिती घ्या.२. आपल्याला परवडेल अशी किमान ३ ते ५ लाख रकमेपर्यंत मेडिक्लेम पॉलिसी निवडा.३. शक्यतो परिवारासाठी फ्लोटिंग पॉलिसीचा पर्याय निवडा. जेणेकरून सर्वांना त्या रकमेचे कव्हरेज मिळेल.४. घरातील सर्व सदस्यांना मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट करा.५. मेडिक्लेमसंदर्भात सर्व नियम आणि अटी याचा बारकाईने अभ्यास करा. कारण काही आजार तत्काळ तर काही आजार एक किंवा दोन वर्षांनी पॉलिसी अंतर्गत समाविष्ट होतात.६. TPA म्हणजेच थर्ड पार्टी असोसिएटचे विमा कार्ड आणि पॉलिसी क्रमांक कायम सोबत ठेवा.

मेडिक्लेम पॉलिसीची मुदत एका वर्षाची असते. ती संपण्यापूर्वी किमान एक आठवडा पॉलिसीचे नूतनीकरण करून घ्यावे. पॉलिसी वर्षानुवर्षे सुरु ठेवल्याचे अनेक फायदे असतात. ते विमा एजंटकडून जाणून घ्यावेत. पॉलिसी कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, याची काळजी घ्यावी.

हे लक्षात असू द्या!आपल्याला काही होऊ नये आणि रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये, अशीच सर्वांची इच्छा असते. परमेश्वर कृपेने असेच घडावे. परंतु आपण पॉलिसी काढून पैसे वाया घालविले असे मनात अजिबात आणू नये.मनोरंजनासाठी आणि कुटुंबासाठी एक कर्ती व्यक्ती म्हणून अनेकवेळा रक्कम खर्च करीत असतो. मग कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी दरवर्षी मेडिक्लेम पॉलिसी काढली तर त्यात गैर काय आहे?

टॅग्स :Healthआरोग्य