(Image Credit: OnTrack Diabetes)
स्मरणशक्ती आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. जर आपल्याला काही गोष्टींची आठवणच राहिली नाही, तर किती फजिती होईल हे वेगळं सांगायला नको. अनेकदा पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्याने आणि वाढत्या वयामुळेही आपली स्मरणशक्ती कमी होते. अशात कमकुवत झालेली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खालील उपाय करता येतील...
फळ-भाज्यांचे सेवन
फळं आणि हिरव्या भाज्यांमध्ये असणारे अॅंटीऑक्सिडेंट्स मेंदूच्या रक्त नलिका आणखी मजबूत आणि लवचिक करतात. तसेच फळ-भाज्यांच्या सेवनामुळे डोक्याला फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन मिळतात. जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गरजेचे आहेत. यासोबतच वांगी खाण्याचाही मोठा फायदा होऊ शकतो.
रोज प्राणायाम करा
ध्यान, प्राणायाम आणि व्यायामाने तणाव दूर होतो. आत्मविश्वास वाढतो. एकाग्रता वाढते आणि मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन, रक्त आणि पोषक तत्व मिळतात. या सगळ्या गोष्टींमुळे स्मरणशक्ती वाढते.
पुरेशी झोप घ्या
जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. झोपेमुळे आपण आपल्या डोक्यातील अनेक गोष्टींना आठवू शकतो. चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती कायम ठेवण्याच्या क्षमतेची वाढ होते.
बदाम आणि अक्रोट
स्मरणशक्ती वाढण्यासाठी बदाम खाणं फार उपयोगी मानलं जातं. बदाममधील पोषक तत्व जसेकी प्रोटीन, मॅगनीज, कॉपर आणि रायबोफ्लाविन अल्झायमर हे अनेक रोगांना दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रोज रात्री 5 बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.