(Image Credit : Gaiam)
निरोगी आणि जास्त आयुष्य जगण्यासाठी लाइफस्टाइलही तितकीच हेल्दी आणि चांगली असावी. तुमच्या खाण्या-पिण्यात, उठण्या-बसण्यात, एक्सरसाइज इत्यादी सवयीही योग्य पद्धतीने असायला हव्यात. तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त काळासाठी फायदा होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की, चांगली लाइफस्टाइल हवी असेल तर केवळ डाएट फॉलो करुन किंवा एक्सरसाइज करुन फायदा होतो असे नाही. त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला काही सवयींमध्ये बदल करावे लागतील.
वर्कआउट करा
खरंतर या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की, तुमचं वय कमी आहे की जास्त. पण तुम्हाला दिवसातून किमान अर्धा तास तरी व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे. याने तुमचं हृदय निरोगी आणि फिट राहतं. धावायला जाणे आणि चालणे यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहतं. तसेच नियमीत व्यायाम केल्याने तुम्ही तणावापासूनही दूर राहता.
तीन वेळा जेवण
हे सर्वांनाच माहीत आहे की, तुमच्या खाण्याचा कालावधी ३ वेळात वाटला गेला आहे. एका संतुलित आहारात ६० ते ७० टक्के कार्बोहायड्रेट, १० ते १५ टक्के प्रोटीन असतं, हा आहार घेतलाच पाहिजे. जर असं करत नसाल तर तुमची पचनक्रिया योग्यप्रकारे काम करणार नाही आणि इम्यून सिस्टममध्येही अडचण निर्माण होऊ शकते.
भरपूर पाणी प्यावे
पाण्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करु शकत नाहीत. कारण हे शरीरासाठी एका औषधाप्रमाणे काम करतं. आपलं शरीर हे ७० टक्के पाण्याने तयार झालेलं असतं. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. त्यासोबतच याने मेंदूही नियंत्रणात राहतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली राहते. पाणी पोषक तत्वांना शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
फळं आणि भाज्या भरपूर खाव्यात
काय तुम्ही कधी रेनबो डाएटबाबत ऐकलंय? रेनबो डाएटमध्ये रेनबोमधील सर्व रंगाची फळे आणि भाज्या येतात. हे खाल्ल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. त्यासोबतच या आहाराने तुमची त्वचा आणि केसही चांगले राहतात.
जेवण आणि झोपण्यात अंतर
जेवण केल्यावर लगेच झोपायला जाणे चुकीचे आहे. जर तुमचीही सवय असशीच असेल तर ही सवय वेळीच बदला. जसजशी रात्र होते, आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म कमी होत जातं. त्यामुळे रात्रीचं जेवण आणि झोपण्याच्या वेळेत २ तासांच अंतर असावं. असे नाही केले तर तुमचं वजन वाढतं.