- निनाद महाजनमोबाईल डेटा कुठंं उडतो हे अनेकदा कळतच नाही. आपण मारतोय रिचार्जवर रिचार्ज पण डेटा गायब. आपला डेटा नक्की जातोय कुठं? फॉरवर्डच्या खेळात. तो तर जातोच. म्हणजे आपण फॉरवर्ड मारावेत म्हणून कसलेही पुचाट जोक मार्केटमध्ये ओतले जातात आणि आपण हिरिरीने ते फॉरवर्ड करतो. त्यात आपला डेटा जाळतो. घरबसल्या आपला डेटा जाळू नका, त्यापेक्षा जरा डोकं वापरा. डेटा वाचवा आणि आपले पैसेही! ते कसे वाचवता येतील? त्यासाठीच्या या काही एकदम साध्या टिप्स. पण करुन पहा. डेटा वाचेल.
आपल्याला कळतही नाही, आणि नको त्या गोष्टी आॅटो डाऊनलोड होत राहतात. त्या टाळायच्या तर डिशेबल पुश कनेक्ट बंद करुन टाका. विशेषत: फेसबुक फोनवर वापरताना हे कराच.फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा, अकाऊण्ट सेटिंगमध्ये जावून डेटा मेन्यू चेक करा. तिथं हा आॅप्शन मिळेल. तो बंद करा.५) फॉरवर्ड खेळ थांबवाआपल्याला काय वाटतं आलं फॉरवर्ड फुकट आहे? तसं नाही. आलं फॉरवर्ड डाऊनलोड करुन पाहिलंच पाहिजे का? विचारा स्वत:ला. नको ते म्युझिक व्हिडिओ, नको ते फोटो डाऊनलोड करू नका. केले तरी पुढं पाठवू नका. त्यानं आपला डेटा निम्म्यानं वाचेल.