- मयूर पठाडेकोणी नुसतं म्हणायचा अवकाश.. अरे तुझी तब्येत चांगली सुधारलेली दिसतेय.. समोरच्या माणसानं खरोखरच प्रामाणिकपणे आणि चांगल्या अर्थानं ही प्रतिक्रिया दिलेली असली तरी ज्या व्यक्तीला ही प्रतिक्रिया मिळालेली असते, ती व्यक्ती एकदम सजग होते. याचा अर्थ ‘आपण जाड झालोय’ असा सरळ सरळ अर्थ ती व्यक्ती काढते. आधीच त्याबद्दल स्वत:च्या मनात अपराधी भाव असतोच, तो अशावेळी आणखी उफाळून येतो आणि मग बारीक होण्याच्या खटपटी लटपटी सुरू होतात. सगळ्यात पहिल्यांदा संक्रांत येते ती खाण्यावर. मग हे खायचं नाही, ते खायचं नाही, या पदार्थाला तर शिवायचंही नाही.. अशा गोष्टी सुरू होतात..पण खाण्यापिण्यावर इतके निर्बंध घातले तर बारीक होणं तर सोडाच, आजारी पडण्याचा प्रकार होतो आणि बºयाच जणांना त्याचा सामना करावाही लागतो. अनेकांना आवडते खाद्यपदार्थ सोडायला खूप जिवावर येतं, तरीही महत्त्प्रयासानं ते त्यावर कंट्रोल ठेवतात, पण खरं तर खाण्यापिण्यावर अतिरेकी कंट्रोल न ठेवताही आपल्याला आपली तब्येत कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते.कसं?..
आवडीचे पदार्थ खाऊनही कसं ठेवाल स्वत:ला कंट्रोलमध्ये?१- बारीक होणं म्हणजे कमी खाणं नव्हे. पोटभर खाऊनही आपल्याला आपल्या शरीराचा, पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो.२- जे पदार्थ आपण खातोय, त्यातील उष्मांक कमी असले पाहिजेत आणि आवश्यक तेवढे पोषक द्रव्यं आपल्या शरीरात गेले पाहिजेत याची काळजी मात्र घेतली गेली पाहिजे.३- अनेक जण बटाटा, साखर या गोष्टींवर सरसकट बंदी आणतात, पण बटाट्यासारखे पदार्थही आपण खाऊ शकतो. पण ते तेलात तळून खाण्यापेक्षा उकडून, भाजून सालीसकट आपण खाऊ शकतो.३- प्रोटिनयुक्त आहार घेतल्यास त्याने पोट लवकर भरते आणि शिवाय कमी खाऊनही पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे इतर पदार्थ आपोआपच कमी खाल्ले जातात.४- प्रथिनांमध्येही चांगले आणि वाईट प्रथिनं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आपल्या शरीरावर त्यांचा काय परिणाम होतो, हे आपल्याला माहीत असलं तर आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतो.५- चांगले प्रथिनं- शेंगदाणा, शेंगदाणा तेल, टोण्ड दूध, दही उकडलेली अंडी.. यांत चांगल्या प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं.६- वाईट प्रथिनं- चरबीयुक्त मांस, चीज, म्हशीचं दूध, तुप, तेलाचा मुक्त वापर करुन केलेले पदार्थ.. असे पदार्थ शक्यतो टाळले पाहिजे.