Warm water : मसाले भारतीय पदार्थांचा जीव आहे. त्यांशिवाय खाण्याचा विचारही केला जात नाही. मसाल्यांमुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच त्यांचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. किचनमध्ये ठेवलेले मसाले आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्याच्या कामी येतात. उदाहरण द्यायचं तर सर्दी-खोकला झाल्यावर हळदीचं दूध किंवा काळ मिरे व ओव्याचा चहा प्यायल्याने लगेच आराम मिळतो. अशात कोमट पाण्यात जीरं, धने, बडीशेप आणि मेथीचं पावडर मिक्स करून प्याल तर शरीराला अनेक फायदे मिळतात. ते काय जाणून घेऊ....
कोमट पाण्यात जीरं, धने, बडीशेप आणि मेथी पावडरचे फायदे
ब्लड शुगर
जर तुम्ही हे 4 मसाले कोमट टाकून प्याल तर तुमची ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहणार. HbA1c कमी करण्यासही याने मदत मिळेल. हे चारही मसाले इन्सुलिन वाढवण्याचं काम करत करतात.
पोट होतं मजबूत
हे मसाले पाण्यात टाकून प्यायल्याने मलत्याग करण्यास मदत मिळते. याने पचनशक्ती मजबूत होते आणि इम्यून सिस्टीमही बूस्ट होतं. त्याशिवाय या पाण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते.
वजन होतं कमी
वरील फायद्यांसोबतच हे मसाले पाण्यात टाकून प्याल तर तुम्हाला वाढलेलं वजन कमी करण्यासही फायदा होईल. कारण हे मसाल्याचं पाणी प्यायल्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. तसेच पोषक तत्वांचं अवशोषणही चांगलं होतं.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
तुम्ही जर रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात जीरं, धने, बडीशेप, ओवा आणि आणि मेथी पावडर टाकून प्याल तर तुम्हाला जेवण पचवण्यात मदत मिळेल. यामुळे तुमचं मेटाबॉलिज्मही मजबूत होईल.