केसांना रोज धुणे अपायकारक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 6:39 PM
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपल्या केसांची काळजी घेणे अनिवार्य आहे, त्यासाठी सर्वचजण प्रयत्न करतात. मात्र बरेचजण धूळ व प्रदूषणामुळे खराब झालेल्या केसांना रोजच धुतात.
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपल्या केसांची काळजी घेणे अनिवार्य आहे, त्यासाठी सर्वचजण प्रयत्न करतात. मात्र बरेचजण धूळ व प्रदूषणामुळे खराब झालेल्या केसांना रोजच धुतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या शॅम्पूचा वापर सर्रासपणे केला जातो. परंतु आपणास माहित आहे का यामुळे तुमच्या केसांना किती अपाय होऊ शकतो?एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून तीन-चार वेळा जरी शॅम्पूने धुतले तरी तुमचे केस डॅमेज होतात. डर्मेेटोलॉजिस्ट आणि स्टायलिस्टच्या म्हणण्यानुसार केसांना रोज धुण्यामागची अनेक कारणे आहेत. केस एक प्रकारचे फायबर आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही जितके जास्त धुवाल तितके ते खराब दिसतील. शिवाय केस गळती, अकाली पांढरे होणे अशा समस्या उद्भण्यासदेखील सुरूवात होते.