Water After Meals: पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि अनेक महत्वाची शारीरिक कामे करण्यास मदत करतं. पण बरेच लोक पाणी पिण्यात एक चूक करतात. ती म्हणजे बरेच लोक जेवण केल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. ज्या जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया प्रभावित होऊ शकते. पाणी प्यायल्याने पोटातील अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे जेवण पचण्यास समस्या होते. याच कारणाने गॅस, पोट फुगणं, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या होऊ लागतात. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्याने काय समस्या होतात.
पचनक्रिया प्रभावित होते
अन्न पचन्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रसांची गरज असते. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न पचन्यास समस्या होते. याने पोटात गॅस, पोट फुगणं, अपचन अशा समस्या होतात.
अन्नातील पोषक तत्व कमी अब्जॉर्ब होतात
अन्नातील पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रस गरजेचे असतात. पण पाण्यामुळे हे रसा पातळ होतात, ज्यामुळे पोषक तत्व अब्जॉर्ब कमी होतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात.
पोटात गॅस आणि पोट फुगणे
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील अन्न आणि गॅस यांच्यातील मिश्रण पातळ होतं. ज्यामुळे पोटात गॅस वाढू लागतो. यामुळे पोट फुगणं, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या होऊ लागतात.
अपचन आणि बद्धकोष्ठता
पाणी प्यायल्याने पोटातील अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे अन्न पचन्यास अडचण येते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
पोटात अॅसिडिटी
जसे की, आधी सांगितलं जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील गरजेचं अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे पोटात अॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, अल्सरसारख्या समस्या होऊ शकतात.