(Image Credit : express.co.uk)
एका रिसर्चनुसार, जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. १२०० लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये ३ महिन्यात ४४ टक्के वजन कमी आढळलं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं.
पाण्याने वजन कमी कसं होतं?
भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर पचनासंबंधी समस्या होतात आणि आरोग्यही बिघडतं. पाणी दोनप्रकारे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतं. एक म्हणजे पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं. दुसरं म्हणजे पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते.
जेवणाआधी प्यावं पाणी
जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जेवण हवं तेवढंच कराल, ओव्हरइटिंग करणार नाही. यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं. पण रिसर्चनुसार, काही लोकांसाठी हे पाणी पिण्याचं प्रमाण ५ लिटर असू शकतं.
लिपोलिसिस आणि थर्मोजेनेसिसला वाढवतं पाणी
(Image Credit : health.harvard.edu)
पाणी लिपोलिसिसच्या प्रोसेसचा वेग वाढवतं. लिपोलिसिस एक चयापचन प्रक्रिया आहे. ज्याच्या माध्यमातून लिपिड ट्रायग्लिसराइड्सला ग्लिसरॉल आणि फॅटी अॅसिड हायड्रोलाइज केलं जातं. बीएमआय हे व्यक्तीतील कमी वजन, जास्त वजन आणि लठ्ठपणा या स्थितीबाबत ठरवतं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतं. थर्मोजेनेसिस एक अशी प्रोसेस आहे, ज्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.
पाणी कमी कॅलरी डाएटमध्ये
पाणी नैसर्गिक रूपाने कॅलरी मुक्त असतं. त्यामुळे सामान्यपणे कमी कॅलरी डाएटमध्ये याचा समावेश केला जातो. जेवणाआधी पाणी प्यायल्याने मध्यम वयातील आणि वृद्ध व्यक्तींना भूक कमी लागते. याचाच परिणाम म्हणजे कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजनही कमी होतं. रोज जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि १२ आठवड्यात २ किलो वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे वजन कमी करणार असाल तर जेवण करण्याच्या २० ते ३० मिनिटांआधी पाणी प्यावे. नाश्त्याआधी पाण्याचं सेवन केल्याने कॅलरी १३ टक्के कमी होतात.
पाणी पिण्याची योग्य पद्धत
आयुर्वेदानुसार, पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जाईल. उभे पाहून पाणी प्यायल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषत तत्व मिळत नाहीत. सोबतच पाणी एकदाच घाईने पिण्याऐवजी एक एक घोट घेऊन आणि हळूहळू प्यावं. याचं कारण जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होते.