दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे असे तज्ज्ञ सांगतात. कारण पाण्याच्या मदतीने आपले शरीर विषारी घटक बाहेर टाकते. डॉक्टरसुद्धा नेहमी जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे पचन क्रिया, त्वचा आणि केस मजबूत होण्यास मदत होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास नुकसान देखील होऊ शकते. पाण्याच्या अतिसेवनाचे नुकसान याबाबत माहिती घेऊयात.
हृदयाला धोकापाण्याच्या अति सेवनामुळे हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. जास्त पाणी प्यायल्याने रक्त जास्त प्रमाणात तयार होते आणि त्याचा दबाव धमन्यांवर येतो.
किडन्यांचे आरोग्य धोक्यात येतेपाण्याच्या अतिसेवनामुळे किडन्यांमधील आर्जिनिन वैसोप्रेसिनचा प्लाज्मा स्तर कमी होतो. याचा किडन्यांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो.
पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. कारण, शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते. तसेच शरीरास अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
लिव्हरला धोकाजर तुम्ही पाण्याचे अतिसेवन करत असाल आणि त्यात लोकाचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे तुमच्या लिव्हरला त्याचा धोका असतो. त्यामुळे लोहयुक्त पाणी पिणे टाळा.
उपायजर तुम्हाला ओव्हर हायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरचा त्वरित सल्ला घ्या. दिवसभरात तुम्ही किती पाणी पिता यावर लक्ष द्या. जास्त पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवा तसेच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या औषधांबाबत डॉक्टरकडून योग्य तो सल्ला घ्या.