पुणे : मनाेरंजानाच्या शेकडाे गाेष्टी अाजूबाजूला असताना अनेकांना तणावाने ग्रासले अाहे. पैशांच्या मागे धावताना शांतता हरवून बसलेले बरेचसे लाेक अापल्या अाजूबाजूला अापण पाहत असताे. या तणावातून मुक्ती नेमकी मिळवायची कशी हे मात्र उमगत नसते. तुमच्या दैनंदिन अायुष्यातून तणावाला दूर करण्यासाठी मानसाेपचार तज्ज्ञ दीपा निलेगावकर यांच्या या सहा टीप्स नक्की फाेलाे करा. 1) प्राेफेशनल अायुष्य अाणि पर्सनल अायुष्य वेगळं ठेवाप्राेफेशनल अायुष्य अाणि पर्सनल अायुष्य या दाेन वेगळ्या गाेष्टी अाहेत, हे अाधी लक्षात घेतलं पाहिजे. अाॅफिसमधून घरी गेल्यानंतर घरचा संपूर्ण वेळ हा कुटुंबासाठी द्यायला हवा. कामाच्या गाेष्टी घरी केल्यानंतर घरचे वातावरण बिघडू शकते अाणि त्यातून वाद-विवाद हाेऊ शकतात. त्याचबराेबर अापल्या वैयक्तिक अायुष्याचा अापल्या कामावर परिणाम हाेणार नाही, याचा विचार करणेही गरजेचे अाहे.
2) नियम माझ्यासाठी की मी नियमांसाठीअनेकदा अायुष्यात काही मिळवण्यासाठी अापण अापल्याला नियम घालून घेत असताे. प्रत्येकाने अापले अायुष्य जगण्याची एक चाैकट घालून घेतलेली असते. स्वतःवर घातलेले नियम पाळताना अनेकदा त्या नियमांचाच तणाव मनावर येत असताे. नियम पाळत असताना अापलीच दमछाक हाेत असते. त्यामुळे नियम हे स्वतःसाठी अाहेत. की तुम्ही नियमांसाठी अाहात याचा विचार व्हायला हवा. त्या नियमामंध्ये लवचिकता असायला हवी.
3) स्वतःसाठी वेळ द्यास्वतःसाठी वेळ देणं याचा अर्थ अाॅफिस मधून सुट्टी घेऊन घरची कामं, किंवा स्वतःची कामं करणे असा हाेत नाही, तर स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे अाॅफिसमधील किंवा घरचं कुठलंही काम न करता संपूर्णवेळ हा शांतता मिळविण्यासाठी घालवणे. ताणापासून दूर जाण्यासाठी प्रत्येकाने दरराेज काही वेळ नुसतं शांत बसून राहायला हवं. वाटल्यास एखादी चक्कर मारुन यावी. किंवा तुमच्या अावडीची गाणी तुम्ही एेकू शकता. या सगळ्यामुळे तुम्हाला नक्कीच ताणतणावापासून दूर जाण्यासाठी फायदा हाेईल.
4) अपेक्षांचं अाेझं बाळगू नका प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा काही अपेक्षा असतात. तरुणांकडून त्यांच्या पालकांच्या अपेक्षा असतात. काेणाला वाटतं अापल्या पाल्याने डाॅक्टर, इंजिनिअर व्हावं. स्वतःच्या, पालकांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करताना अापण स्वतःलाच हरवून बसताे. एकाक्षणानंतर त्या अपेक्षा या अाेक्षं हाेऊन बसतात. अाणि या अाेझ्याखाली अापण अापला अानंद हिरावून बसताे. त्यामुळे अपेक्षांचं अाेझं बाळगू नका.
5) तुमच्या सुखाची व्याख्या शाेधा स्वतःचं घर अाहे, चारचाकी अाहे, समृद्धी अाहे पण समाधान नाही. अापलं सुख, अापला अानंद कशात अाहे याचा शाेध घेण्याचा प्रयत्न करा. छाेट्या छाेट्या गाेष्टींमध्ये अानंद शाेधा. सध्या भाैतिक गाेष्टींमध्ये सुखः शाेधलं जात अाहे. अाणि या भाैतिक गाेष्टींचा पाठलाग करताना नैराश्याकडे जाण्याचा प्रवास सुरु हाेताे. त्यामुळे स्वतःच्या सुखाची व्याख्या करणं अावश्यक अाहे.
6) स्वतःकडे अाणि समाेरच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघासर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे अाणि समाेरच्याकडे एक व्यक्ती म्हणून अापण पाहायला हवं. नेहमी फायद्यासाठी अापण नाती तयार केली तर त्याचं अाेझं मनावर जाणवत राहिल. त्याचबराेबर स्वतःवर अन्याय करत मनाविरुद्ध गाेष्टी अापण करत राहिलाे तर त्यातूनही तणाव येत असताे. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःकडे अाणि समाेरच्याकडे एक व्यक्ती म्हणून अापण बघायला शिकलं पाहिजे.