कोरोनापासून बचावासाठी जोपर्यंत लस किंवा प्रभावी औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. सध्या सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर केल्याशिवाय कोरोनापासून बचाव करणं कठीण आहे. अमेरिकेतील सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी दिर्घकाळपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग, स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देत जगावं लागणार आहे.
भारतासारख्या अनेक देशात वातावरणातील बदलांमुळे मास्कचा वापर केल्याने चालण्या फिरण्याासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरणं, दम लागणं अशा समस्यांचा जाणवतात. पण आपण जेव्हा खासगी वाहनांतून किवा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करतो तेव्हा मास्क लावायला हवा की नाही. याबाबत माहिती देणार आहोत. मास्कच्या वापराबाबत काही गोष्टी माहीत असल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
मास्कचा वापर कितपत सुरक्षित
आजकाल रस्त्यावर सर्वच व्यक्ती मास्क लावून वावरताना दिसून येतात. किंवा कारमध्ये बसलेली माणसंसुद्धा आपल्या तोंडाला मास्क लावतात. काही लोक कारमध्ये बसल्यानंतर मास्क लावून ठेवत नाहीत. तुम्ही सुद्धा विचार करत असाल कार चालवतानाही मास्क वापरणं गरजेचं आहे का? जर एखादी व्यक्ती आपल्या कारमध्ये एकटी असेल तर मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. घरातील व्यक्तींशिवाय इतर व्यक्ती कारने प्रवास करताना सोबत असतील तर दोघांनीही मास्क लावणं गरजेचं आहे.
तुम्ही घरच्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर कारमध्ये मास्कचा वापर करायलाच हवा. याशिवाय कारमध्ये एयर कंडीशनर "रीसर्क्युलेशन" सेटिंगमुळे एसीच्या हवेने कोरोनाचं संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.
तुम्ही आजारी असाल तर इतरांसोबत प्रवास करणं टाळा. कारण तुमच्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. सौम्य सर्दी, खोकला किंवा शिंका येत असतील तर मास्कचा वापर करा. जर तुम्ही कमी अंतरावरच्या प्रवासासाठी एकटे जात असाल तर मास्कचा वापर टाळला तरी चालू शकेल.
CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार!
मेड इन इंडिया! अखेर भारताने 'अशी' तयार केली कोरोनाचा खात्मा करणारी लस