Weak Heart Symptoms: हे तर सर्वांनाच माहीत आहे की, हृदय आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जे न थांबता सतत काम करत असतं. तेच आजच्या काळात जगभरात हृदयासंबंधी समस्यांमुळे लोकांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आजकाल 35 ते 40 वयातील लोकही हार्ट अटॅक किंवा हार्ट फेलिअरच्या कारणाने मृत्यूमुखी पडत आहेत.
याचं कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लाइफस्टाईल आणि परिवारात हार्ट डिजीजची हिस्ट्री हे आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे आपलं हृदय कमजोर होत आहे. तेच हृदय कमजोर झालं की, शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशात चला जाणून घेऊ की, जेव्हा हृदय कमजोर होतं तेव्हा शरीर कोणते कोणते संकेत देतं.
छातीत जळजळ - हृदय कमजोर झाल्यावर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. सुरूवातील जेव्हा हृदय कमजोर होतं तेव्हा व्यक्तीला सतत मळमळीची समस्या होते. त्यासोबतच छातीत सतत जळजळ होऊ लागते. जर तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
हाय ब्लड प्रेशर - हृदय कमजोर झाल्यावर तुमचं ब्लड प्रेशर अनियंत्रित होतं. हृदय कमजोर झालं की, हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढली की, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशात नेहमीच ब्लड प्रेशर चेक करत रहावं.
श्वास घेण्यास त्रास - श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हाही हृदय कमजोर झाल्याचा संकेत आहे. हृदय कमजोर झालं की, श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. अशात वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
सतत सर्दी-खोकला - सतत सर्दी - खोकला होत असेल हाही हृदय कमजोर झाल्याचा संकेत आहे. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार घ्यावे.