कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. कोरोनासोबत जगत असताना बाहेर वावरताना मास्कचा वापर करणं अनिर्वाय आहे. पण सतत मास्क घातल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, ऑक्सिजनची कमतरता भासणं, घाम येण, गुदमरणं अशा समस्या उद्भवतात. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना कराव लागत असेल तर आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
डिस्पोजेबल मास्कचा वापर करा
मास्क आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनलेलं आहे. अनेकजण एन 95 मास्क घेत आहेत. त्यासाठी तुलनेने पैसे जास्त लागतात. सतत एकच मास्क वापरल्यामुळे घाम येतो. एलर्जी, मास्कचा वास येणं, खाज, खुलजी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून डिस्पोजेबल मास्कचा वापर करा. एकदा वापरून मास्क फेकून देणं सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.
घरातून बाहेर पडणं टाळा
गरमीच्या वातावरणात मास्क वापरल्यानंतर घाम येणारचं. त्यामुळे पुन्हा त्याच मास्कचा वापर करणं टाळा, घरातून कमीतकमी वेळा बाहेर पडा. बाहेरील लोकांपासून लांब राहा. तुम्हाला सतत घाम येण्याची असेल तर शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.04 टक्के असतं. पण प्रमाण १० टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास जीवघेणं ठरू शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती मास्कचा वापर करते. त्यावेळी श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची प्रक्रिया सुरू असते.
मास्क जास्तवेळ घातल्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कारण जेव्हा श्वास सोडला जातो. तेव्हा खूपवेळी ती हवा तोंडाभोवतीच असते. अशा स्थितीत सोडलेल्या श्वासासोबतच म्हणजेच कार्बन डायऑक्साईडसोबत ऑक्सिजन घेतला जातो. सीओ2 रक्ततील ph नियंत्रणात ठेवतात. जास्त प्रमाण सीओ2 असल्यास रक्त एसिडीक होण्याची शक्यता असते. जेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा हवा असतो. त्यावेळी उपलब्ध न झाल्याने श्वास घेण्याची समस्या वाढत जाते.
एन 95 मास्क आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही या मास्कचा वापर करत असाल तर दीर्घकाळ वापरू नका. धावत असताना किंवा वेगाने चालताना एन95 मास्क काढून टाका. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क गरजेपेक्षा जास्त घट्ट बांधू नका. घरी तयार केलेले मास्क जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. .
आता कोरोना विषाणूला ९९ टक्के नष्ट करणारी लस येणार; क्लिनिकल ट्रायलचे 2 टप्पे यशस्वी
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत देतात ही लक्षणे, कोरोनापासून वाचण्यासाठी घ्या खबरदारी