हल्ली अनेक तरूण मुलं-मुली फॅशनेबल राहण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त टाइट कपडे वेअर करतात. खासकरून मुली टाइट जिन्स, लेगिंग्स वेअर करतात. फॅशनेबल दिसणं एका मर्यादेपर्यंत ठिक आहे. पण एवढंही नाही की, त्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचेल. तरूणी अनेकदा टाइट जिन्स वेअर करायला प्राधान्य देतात. कारम यामध्ये त्यांचा बॉडी शेप फार सुंदर दिसतो. जिंस असो किंवा इतर टाइट कपडे, आरोग्यासाठी घातक ठरतात. टाइट फिट जिन्स वेअर केल्याने तुम्हाला अनेक आजारांचा सामनाही करावा लागू शकतो.
टाइट जिन्स किंवा कपडे वेअर केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या
- अनेकदा लोक फॅशन ट्रेन्डमध्ये रागण्यासाठी टाइट फिटिंग असणाऱ्या जिन्स, स्कर्ट्स आणि इतर ड्रेसेस वेअर करतात. परंतु, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशाप्रकारच्या ड्रेसमुळे तुम्हाला चालण्या-फिरण्यास त्रास होतोच. तसेच यामुळे पॉश्चरही चेंज होतो.
– टाइट जिन्स वेअर केल्याने उठण्या-बसण्यास त्रास होतो. ज्यामुळे मणक्याच्या हाडांवरही इफेक्ट होतो.
– टाइट जिंन्समुळे तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
– जिन्समुळे स्किन प्रॉब्लेम्सही होऊ शकतात. ज्यावेळी तुम्ही टाइट कपडे वेअर करता त्यावेळी ब्लड सर्क्युलेशन आणि नर्वस सिस्टिमवर प्रभाव पडतो. एवढच नाहीतर बराच वेळ शरीराला जिन्स चिकटून राहते. त्यामुळे घाम पूर्णपणे सुकत नाही. तसेच त्वचेच्या समस्या आणि खाज, रॅशजच्या समस्या उद्भवतात.
इतर शारीरिक समस्या...
कँडिडा यीस्ट इन्फेक्शचा धोका
हे इन्फेक्शन शरीराच्या विशेष अंगांमध्ये पसरतं. खासकरून अशा ठिकाणी जिथे ओलावा किंवा उष्णता जास्त अलते. यामुळे खाज आणि वेदनांचा सामना करावा लागतो. हे इन्फेक्शन मुलांमध्ये जास्त असतं. कारण ते टाइट पॅन्ट वेअर करतात.
पोटाच्या समस्या
टाइट कपडे पोटाला चिकटून राहतात आणि पोटावर प्रेशर येतं. ज्यामुळे पोटदुखी, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात. अशा कपड्यांमुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो.
बेशुद्ध होणं
सतत टाइट कपडे वेअर केल्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो आणि जास्त घामही येतो. अशाप्रकारची स्थिती बेशुद्ध होण्यासाठी कारण ठरते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)