(Image Credit : Spectator Health)
अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे किंवा बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यत जाडेपणाची समस्या भेडसावत आहे. खासकरून कमी वयात जाडेपणा येणे डोकेदुखी ठरत आहे. अशात लहान मुलांना जर जाडेपणापासून दूर ठेवायचं असेल तर काय करायचं यावर एक रिसर्च करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार लहान मुला-मुलींना जाडेपणापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचं ते दोन वर्षांचे असतानापासून वजन चेक करा.
लहान मुला-मुलींमध्ये वाढत्या जाडेपणावर ऑक्सफोर्ड आणि मॅन्चेस्टर यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी चिंता व्यक्ती केली. अभ्यासक म्हणले की, सामान्यपणे लहान मुला-मुलींचं वजन त्यांच्या ११ वर्षांनंतर चेक केलं जातं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यादरम्यान दर पाचपैकी एक मुल हे ओव्हरवेट झालेलं असतं.
दरवर्षी चेक करा वजन
मॅन्चेस्टर आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, दोन वर्षांचे असतानापासूनच प्रत्येक मुला-मुलींचं वजन चेक करायला हवं. जेणेकरून जाडेपणा सुरू होण्यापूर्वी त्याला रोखल जाऊ शकेल.
अभ्यासकांनुसार, जगभरात ७ लाख ५० हजार लहान मुलांच्या शारीरिक विकासाची आकडेवारी घेण्यात आली. यातून हे समोर आलं की, लहान मुले शाळेत जाण्याच्या वयाआधीच त्यांचं वजन चेक केलं तर ते जाडेपणापासून दूर राहू शकतात. अभ्यासक डॉ. हीदर रॉबिन्सन म्हणाले की, याला बीएमआयच्या मदतीने समजून घेता येऊ शकतं.
लंडनमध्ये ११ वर्ष वयातील साधारण पाच लाख मुलं-मुली जाडेपणाच्या शिकार आहेत. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, यांना पुढे जाऊन जाडेपणामुळे हृदयरोग, डायबिटीज आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
अभ्यासक डॉ. हीदर रॉबिन्सन यांच्यानुसार, २ ते ५ वयादरम्यान प्रत्येक लहान मुला-मुलींचा विकास वेगवेगळा होऊ शकतो. पण विकास किती चांगल्याप्रकारे होत आहे, हे तेव्हाच सांगितलं जाऊ शकतं जेव्हा दरवर्षी त्यांच्या वजनाची आकडेवारी समोर असेल. त्यामुळे जितकं लवकर शक्य आहे तितकं लवकर त्यांचं वजन करावं.
रिसर्चनुसार, शाळेत जाईपर्यंत लहान मुलांच्या वजनाकडे पाहून हे सांगितलं जाऊ शकतं की, भविष्यात जाडेपणाची किती शक्यता आहे. लंडन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ष २००० नंतर जाडेपणा वाढण्याची प्रकरणे फार जास्त वेगाने वाढली आहेत.