जगभरात वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण आरोग्य चांगलं राखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि चुकीच्या सवयींवर कंट्रोल करत नाही. त्यामुळे लोक कमी वयातच लठ्ठपणाचे शिकार होतात. अमेरिकेतील वयस्कांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून तर फारच धक्कादायक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, जर २५ वयाच्या आसपास तुमचं वजन वाढलं तर अकाली निधनाचा धोका अधिक वाढतो. हा रिसर्च 'बीएमजे' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं
चीनच्या हाउझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमधील अभ्यासकांनी या रिसर्चबाबत निष्कर्ष काढला. त्यांनी अकाली मृत्युचा धोका कमी करण्यासाठी वयस्क वयादरम्यान वजन सामान्य ठेवण्यावर अधिक भर दिला. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, कमी वयात वजन वाढण्याच्या आणि अकाली मृत्युचा संबंध आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा अंदाज
या रिसर्चचे निष्कर्ष १९८८-१९९४ आणि १९९९-२०१४ दरम्यान यूएस नॅशनल हेल्थ अॅन्ड न्यूट्रिशन एग्जामिनेशन सर्व्हेच्या आकडेवारीवर आधारित आहे. एनएचएएनईएस राष्ट्रीय स्तराचं वार्षिक सर्व्हेक्षण आहे. यात अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याबाबत नमूने असतात.
वजनी लहान मुलांना अॅलर्जीचा धोका
अभ्यासकांना आढळलं की, वजनदार बालकांना फूड अॅलर्जी किंवा एग्जिमा होण्याची शक्यता अधिक राहते. हा रिसर्च जर्नल ऑफ अॅलर्जी अॅन्ड क्लिनिकल इम्यूनॉलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. १५ हजार रिसर्चच्या स्क्रिनींगनंतर त्यांनी ४२ ची ओळख पटवली. ज्यात २० लाखांपेक्षा अधिक अॅलर्जी पीडितांचा डेटा मिळाला. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड युनिव्हर्सिटीच्या कॅथी गॅटफोर्ड म्हणाल्या की, 'जन्मावेळी बाळाच्या वाढणाऱ्या दर किलोग्रॅम वजनामुळे बाळांमध्ये अॅलर्जी होण्याचा धोका ४४ टक्के आणि अग्जिमा होण्याचा धोका १७ टक्के असतो'.