फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अलिकडे ग्रीन टीची क्रेझ चांगलीच वाढली आहे. आणखीही काही वेगळ्या चहांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण तुम्ही कधी अॅपल टीबाबत ऐकलंय का? अॅपल टी म्हणजे सफरचंद या फळापासून तयार केलेला चहा. या खास चहाने वजन कमी होण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही भर पडते. अॅपलमध्ये मिनरल्स, अॅंटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अॅपलचा चहा यूरोपमध्ये प्रसिद्ध आहे. याने हाय बीपी आणि कोलोस्ट्रॉल कंट्रोल करण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
अॅपलच्या चहामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हा चहा वजन कमी करण्यासाठी खास पर्याय मानला जातो.
टॉक्सिन काढून टाकतं
अॅपलचा चहा पचनक्रियेतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया आणखी चांगली होते. सोबतच पेशींचा ऑक्सिडेटिव स्ट्रेसपासून बचाव करतो.
ब्लड शुगर कंट्रोल
अॅंटीऑक्सिडेंट्स व्यतिरीक्त अॅपलमध्ये नॅच्युरल शुगर अशते. जी मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करण्यासोबतच ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करते. ब्लड शुगरमध्ये अचानक होणारी वाढ किंवा कमतरता याने रोखली जाते.
कमी कॅलरी
अॅपल हा निगेटीव्ह कॅलरी फळामध्ये येतो. याचा अर्थ या फळामध्ये फार कमी किंवा अगदीच नगण्य कॅलरी असतात. त्यामुळे अॅपलचा चहा कॅलरी बॅलन्स करण्यात मदत करतो.
कसा बनवाल चहा?
अॅपलचा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला १ अॅपल, ३ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, २ टी बॅग आणि दालचीनी पावडरची गरज असेल. एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस टाका, नंतर त्यात टी बॅग टाका. काही वेळ या उकळी येऊ द्या. त्यानंतर कापलेले अॅपलचे तुकडे उकळत्या पाण्यात टाका. जवळपास ५ मिनिटे हे उकळू द्या. त्यानंतर यात दालचीनी पावडर टाका. चहामध्ये मिश्रित दालचीनी डीटॉक्सिफाय करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते.