Weight Loss : आजकाल वाढलेलं वजन ही जगभरातील लोकांसाठी एक गंभीर समस्या झाली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल यामुळे लोकांचं वजन दिवसेंदिवस वाढत आहे. एकदा जर वजन वाढलं तर शरीरात अनेक आजार घर करतात. इतकंच नाही तर अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र, त्यांचं वजन काही कमी होत नाही. अशात काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्याच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
वजन का कमी होत नाही?
जास्तीत जास्त एक्सपर्ट्स हेच सांगतात की, वजन कमी करण्यासाठी हेल्दी आहार घेतला पाहिजे. पण बरेच लोक असे असतात जे हेल्दी आहार घेतात तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य यांचं सेवन करूनही त्याचं वजन कमी होत नाही. एक्सरसाईज करून किंवा पायी चालूनही चरबी कमी होत नाही. अशात एक अशी सवय आहे जी बदलली तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
का वाढतं वजन?
आपण रोज जे खातो त्यातून शरीराला कॅलरी मिळतात आणि कॅलरी ऊर्जा निर्माण करते. जर या ऊर्जेचा वापर होत नाही तेव्हा शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे जे लोक शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातात, ते वजन कमी करू शकत नाहीत. मग त्यांनी हिरव्या भाज्या खावोत की अजून काही.
बदला 'ही' सवय
जर तुम्हाला पोटभर किंवा टेस्टच्या नादात भूकेपेक्षा जास्त खाण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. कारण हीच सवय तुमचं वजन कमी होऊ देत नाही. जर तुम्ही हेल्दी फूड आणि अॅक्टिव लाइफस्टाईलसोबत कमी खाण्याची सवय लावाल तर तुम्हाला वजन कमी करण्यास जास्त फायदा मिळेल.
ब्लू झोनमधील लोकही कमी खातात
ब्लू झोनमध्ये राहणारे लोक फार साधं जीवन जगतात. हे लोक पूर्णपणे शाकाहारी आहार घेतात आणि मांसाहार करत नाहीत. तर काही लोक आठवड्यातून एक दिवस अॅनिमल प्रोडक्ट खातात. यांच्या आहारात ९५ टक्के प्लांट बेस्ड फूडचा समावेश असतो.
ब्लू जोन ओकिनावाचे लोक भूकेच्या केवळ ८० टक्केच जेवण करतात. म्हणजे जर तुम्हाला ४ चपात्यांची भूक असेल तर ते केवळ ३ खातात. येथील लोकांचं आयुष्य जास्त असण्याचं हे गुपित आहे.
आयुर्वेदातही याचा सल्ला
आयुर्वेदात निरोगी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, तुमचा आहार चार भागात विभागून घ्या. दोन भाग जेवणासाठी, एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग हवेसाठी सोडला पाहिजे. या सवयीने तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळेल.