अॅक्यूप्रेशर एक चीनमधील प्राचीन उपचार पद्धत आहे. ज्यात शरीरावरील काही विशेष पॉइंट्सवर बोटांनी दबाव टाकला जातो. असे सांगितले जाते की, या उपचाराने तणाव, डोकेदुखी, वेदना, मळमळ, पीठाचं दुखणं आणि झोपेच्या समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच या पारंपारिक थेरपीचा वापर वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक रोगांना दूर करण्यासाठी देखील केला जातो.
(Image Credit : naturalhealers.com)
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, अॅक्यूप्रेशर केवळ आजार दूर करण्यासाठीच फायदेशीर नाही तर याने मेटाबॉलिज्म वाढवण्यासही आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. याची खासियत म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. तुम्ही स्वत: एकटे हे करू शकता. आपल्या शरीरात भरपूर मसाज पॉइंट्स आहेत, ज्यांवर बोटांनी प्रेशर देऊन सहजपणे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.
ओठ आणि नाकाखालील भाग
(Image Credit : wikihow.com)
ओठावरील आणि नाकाच्या मधे असलेल्या भागावर बोटाने हलकं प्रेशर द्या. या प्रेशर पॉइंटला शुइगो स्पॉट नावाने ओळखलं जातं. नियमितपणे या स्पॉटवर २ ते ३ मिनिटांपर्यंत मसाज केल्याने मेटाबॉलिज्म चांगला होतो आणि याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
हाताचा कोपरा
(Image Credit : acupressurepointsguide.com)
आपला हात थोडा फोल्ड करा आणि कोपराच्या जवळीत पॉइंट शोधा. हा प्रेशर पॉइंट कोपराच्या ठीक एक इंच खाली असतो. हा पॉइंट रोज २ ते ३ मिनिटे अंगठ्याने दाबावा. याने आतड्यांची क्रिया उत्तेजित करण्यास मदत मिळते. ज्याने अर्थात वजन कमी होण्यास मदत मिळते.
इअर पॉइंट
तुमच्या कानाच्या मागच्या भागाला बोटांनी पकडा आणि त्या भागाल वर-खाली करा. जॉ वर आणि खाली करताना बोटांनी प्रेशर देत रहा. हा पॉइंट रोज १ ते २ मिनिटांपर्यंत दाबत रहा. इअर लोबच्या खाली असलेल्या या प्रेशर पॉइंटने भूक नियंत्रित राहते आणि वजन वाढत नाही.
थंब पॉइंट
(Image Credit : pinterest.fr)
अंगठ्याच्या मधल्या भागात प्रेशर पॉइंट असतो. हा पॉइंट दुसऱ्या हाताच्या बोटांनी दाबा. याने थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात आणि मेटाबॉलिज्मला मजबूती मिळते. हा पॉइंट रोज कमीत कमी दोन मिनिटे दाबावा.
त्यासोबतच शरीरात आणखीही अनेक प्रेशर पॉइंट असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. या सर्वच प्रेशर पॉइंटवर प्रेशर देऊन बघा काय होतं. अॅक्यूप्रेशरचे साइड इफेक्ट नसतात त्यामुळे हे तुम्ही करून बघू शकता.