Weight Loss Tips : लठ्ठपणा आजकाल सर्वात मोठी समस्या बनला आहे. ज्यामुळे अनेक लोक हैराण आहेत. लठ्ठपणा एक समस्याच नाही तर एक आजार आहे आणि यामुळे डायबिटीस, कॅन्सर, बीपीसारखे गंभीर आजार होण्याचा धोकाही वाढतो. सध्याच्या काळात प्रत्येक दुसरी व्यक्ती लठ्ठपणाची शिकार आहे. वजन कमी करण्यासाठी लोक नेहमीच जिम आणि वेगवेगळ्या प्रकारेच डाएट प्लानचा आधार घेतात. अर्थातच याने वजन कमी होण्यास मदत मिळते पण पैसे आणि वेळही खूप खर्ची होतो.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्ये घाम गाळणं टाळायचं असेल आणि जास्त पैसे खर्च करायचे नसतील. तर काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुम्ही वजन कमी करू शकता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या उपायांना वैज्ञानिकांचं समर्थन आहे. आणि आणखी एक बाब म्हणजे यात तुम्हाला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही.
एक्सपर्ट सांगतात की, वजन कमी करण्यासाठी अशा चांगल्या सवयी लावाव्या लागतील, ज्याने तुमच्या आरोग्याला नुकसान होणार नाही. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी खाणं-पिणं कमी करतात. जी एक चुकीची पद्धत आहे. एक्सपर्ट सांगतात की, नेहमीच हेल्दी पद्धतीने वजन कमी करावं. एक्सपर्टनी सांगितलेल्या तीन पद्धती वापराल तर वजन कमी करण्यास मदत मिळेल.
रिफाइंड कार्ब्स कमी करा
लवकर वजन कमी करण्याची एक पद्धती म्हणजे शुगर, स्टार्च किंवा कार्बोहायड्रेटमध्ये कपात करणे. यासाठी तुम्हा कार्ब्सचं सेवन कमी करा किंवा रिफाइंड कार्ब्स पूर्णपणे टाळा. त्याऐवजी कडधान्याचं सेवन करा. असं केल्याने भूक लागण्याचा स्तर कमी होतं आणि तुम्ही जास्त कॅलरी खाण्यापासून वाचता. कडधान्य खाऊन तुम्हाला फायबर जास्त मिळेल, जे तुम्ही हळूहळू पचवाल. याने तुमचं पोट भरलेलं राहतं. २०२० मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेटचं सेवन कमी करा. रिसर्चमधून हेही समोर आलं की, कमी कार्ब असलेले पदार्थ खाल तर भूक कमी होते. ज्याने तुम्ही जास्त कॅलरी सेवनापासून वाचता.
प्रोटीन आणि भाज्या खा
आहारात प्रोटीन आणि भाज्यांचा समावेश नक्की करावा. वजन कमी करताना आरोग्य आणि मांसपेशी चांगल्या ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीनचं सेवन करणं गरजेचं आहे. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, प्रोटीन खाल्ल्याने कार्डियोमेटाबॉलिकचा धोका, भूक आणि शरीराच्या वजनात सुधारणा होते. प्रोटीनचं प्रमाण पुरूषांसाठी प्रति दिन ५६-९१ ग्रॅम आणि महिलांसाठी ४६-७५ ग्रॅम आहे. त्यासोबत आहारात ताज्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. हे लक्षात घ्या की, तुमच्या शरीराला हेल्दी फॅटची गरज असते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात जैतूनचं तेल आणि अॅवोकॅडो तेलाचा वापर करा. खोबऱ्याचा तेलाचाही वापर करू शकता.
फिजिकल अॅक्टिविटी आवश्यक
एक्सरसाइज करणं वजन कमी करण्याची प्रभावी पद्धत आहे. याने तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते. एका रिसर्चनुसार, वजन उचलल्याने जास्त कॅलरी बर्न करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत मिळू शकते. वेट लिफ्ट करण्यासाठी आठवड्यातून तिनदा जिमला जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जिमला गेला नाहीत तर एखाद्या ट्रेनरचा सल्ला घ्या. जर उचलण्याला काही पर्याय नसेल तर तुम्ही कार्डिओ वर्कआउट जसे की, चालणे, फिरणे, धावणे, सायकल चालवणे किंवा स्वीमिंगने वजन कमी करण्यास फायदा होतो.
(टिप - वरील लेखातील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. काहीही करण्याआधी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)