शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

Weight Loss Tips : रात्री 'हे' एक काम करूनही कमी करू शकता वजन, फारच सोपी आहे पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:53 AM

Weight Loss Tips : अनेकांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. पण प्रयत्न कधी सोडायचे नसतात. आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. तर....

Weight Loss Tips : अलिकडच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जगभरातील लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हे लोक वजन कमी करण्यासाठी नको नको ते  प्रयत्न करत असतात. डायटिंगपासून ते एक्सरसाइज सगळं करून देखील अनेकांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. पण प्रयत्न कधी सोडायचे नसतात. आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. तर यावर सहजासहजी कुणी विश्वास ठेवणार नाही. पण हे सत्य आहे.

एका रिसर्चनुसार, जे लोक रोज एक तास अधिक झोप घेतात. त्यांना वजन कमी करण्यास मदत मिळते. हा रिसर्च शिकागो यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केला आणि त्यांनीच हा दावा केला आहे. पण इतकंच वाचून लगेच झोपायला जाऊ नका. त्याआधी पूर्ण डिटेल्स वाचा.

काय सांगतो रिसर्च?

शिकागो यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार, प्रत्येक रात्री एक तासांची अधिक झोप घेतल्याने जास्त वजन असणाऱ्या लोकांना वर्षभरात जवळपास ३ किलो वजन कमी करण्यास मदत मिळते. या रिसर्चमध्ये २१ ते ४० वयोगटातील असे ८० लोक सहभागी झाले होते जे रोज ६.५ तासांपेक्षा कमी झोपत होते.

आधी स्मार्ट वॉचने त्यांच्या झोपेचा पॅटर्न चेक केला आणि त्यानंतर त्यांच्या यूरिनमधून कॅलरी सेवन ट्रॅक केलं गेलं. रिसर्चमधून आढळून आलं की, जे लोक रोज १.२ तास म्हणजे १ तास २० मिनिटांपेक्षा अधिक झोप घेतात, त्या लोकांनी २७० कमी कॅलरीचं सेवन केलं होतं.

वैज्ञानिकांनी दावा केला की, असं केल्याने एक वर्षात ४ किलोग्रॅम वजन कमी केलं जाऊ शकतं. एक्सपर्ट्सनी लठ्ठपणापासून वाचण्यासाठी आणि वेट लॉस प्रोग्राममध्ये जास्त झोप घेण्याचा सल्ला देण्यावर जोर देतात. ते असंही म्हणाले की, झोपण्याआधी स्क्रीन टाइम कमी केला तर त्याने त्यांना झोपण्यास अधिक मदत मिळते.

लेखक डॉ. एसरा तसली यांच्यानुसार, जर बराच वेळ पुरेशी झोप घेतली आणि ही सवय बऱ्याच वर्षांपर्यंत असेल तर वजन कमी होऊ शकतं. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आपलं कॅलरी सेवन कमी करण्याच्या पद्धती शोधत आहे. पण रोज काही तासांची अधिक झोप घेतल्याने वजन कमी होऊ शकतं.

३ वर्षात किती कमी होईल वजन?

टीमला आढळलं की,  ज्या लोकांनी चांगली झोप घेतली होती त्या लोकांनी झोपण्याच्या ३० मिनिटांआधी मोबाइल आणि टीव्ही पाहिला नाही. डॉ. तसली यांच्यानुसार, रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या केवळ झोपेत हेरफेर करण्यात आली होती. जर झोपेचा हाच पॅटर्न ठेवला तर जास्त झोपणारे ३ वर्षात १२ किलो वजन कमी करू शकतात. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन