वजन कमी करण्यासाठी अनेकजण संघर्ष करत असतात. कारण जसं-जसं वय वाढतं तसतसा लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठपणा अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे गरजेचं आहे की, तुम्ही वयासोबतच वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. स्वीडनमध्ये कारोलिंस्का इंस्टिट्यूटमध्ये एका नवीन संशोधनातून खुलासा करण्यात आला की, जेव्हा व्यक्तीचं वय वाढतं, त्यावेळी फॅट टिश्यूमध्ये लिपिडचं उत्पादन कमी होतं आणि वजन वाढतं.
संशोधन नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधकांनी हे संशोधन 13 वर्षांत पूर्ण केलं. या दरम्यान, 54 पुरूष आणि महिलांमधील फॅट सेल्सवर संशोधन करण्यात आलं. यावेळी फॅट टिश्यूमध्ये लिपिडचं उत्पादन कमी आढळून आलं.
- वाढत्या वयासोबत शरीर कॅलरीचं उपयोग अनेक प्रकारे करू लागतं. व्यक्ती आपला आहारही आधीप्रमाणेच ठेवतो. परंतु, वाढत्या वयासोबत शरीर आधीप्रमाणे कॅलरी घेऊ नाही शकत. त्यामुळेच वजन वाढू लागतं.
- वाढत्या वयासोबत वाढणारं वजन रोखण्यासाठी आणि वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे डाएटमध्ये कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.
- रात्री कमी म्हणजेचं हलका आहार घ्या आणि जेवल्यानंतर थोडं चालायला विसरू नका. प्रयत्न करा की, लहान मुलांप्रमाणे सतत खाणं टाळा. कारण वय वाढल्यानंतर सतत भूक लागण्याची समस्या वाढते.
नियमितपणे व्यायाम करायला विसरू नका.
संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, वाढत्या वयानुसार, शरीरामध्ये फॅट टिश्यूमध्ये लिपिड उत्पादनाची कमतरता शरीरामधील चरबी वाढवतं. त्यामुळे वजन वाढतं.
हार्मोन्स संतुलन
वाढत्या वयासोबतच शरीरामध्ये अनेक हार्मोनल चेजेंस होतात. ज्यांच्या मदतीने वजन वाढू शकतं. पुरूषांमध्ये टेस्टोरेटॉनचा स्त्राव कमी झाल्याने शरीरामध्ये चरबी वाढू लागते. तसेच महिलांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असंतुलनामुळे वजन वाढतं.
मेटाबॉलिज्ममध्ये चढ-उतार
वयाची चाळीशी पार केल्यानंतर मेटाबॉलिज्ममध्ये फार चढ-उतार येतात. वाझत्या वयामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये मेटाबॉलिज्मचा दर घटू लागतो. ज्यामुळे तुमचं वजन किंवा चरबी वाढू लागते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)