शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

'लठ्ठपणा सर्व आजारांचा राजा' तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 3:36 PM

आजकाल कमी वयामध्ये वजन वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

Weight Loss Tips : आजकाल कमी वयामध्ये वजन वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे. वाढत्या वजनामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जागतिक आरोग्य संस्थेने लठ्ठपणा हा आजार असल्याचे घोषित केले आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांनी 'लठ्ठपणा' हा सर्व आजारांचा राजा आहे, असं म्हटलं आहे. बदलती जीवनशैली तसेच व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणाची प्रमुख कारणे आहेत. जिममध्ये वर्कआऊट केलं किंवा डायटिंग करूनही वजन वाढीच्या प्रमुख लक्षणांकडे अनेकांचं दूर्लक्ष होतं. 

शारीरिक हालचालींची कमतरता, एकाच जागी ठाम बसून राहणे किंवा योग-ध्यान आणि व्यायाम न करणे त्याबरोबरच जंक फूडचे अधिक सेवन यांमुळे वजन वाढते. त्यासाठी वाढतं वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. असं केल्याने अगदी सहजपणे तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. 

आरोग्य तज्ज्ञांनुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढीची समस्या उद्भवू शकते. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी  ऑफ साऊथैम्पटन यांच्या रिपोर्टनुसार जे लोक अगदी घाई-घाईने जेवण करतात त्यांच्या वजनात लवकर वाढ होते. तसेच जे लोक जेवताना एक-एक घास चावून खातात त्यांच्या शरीरामध्ये वजन वाढीची संभावना ४२ टक्के कमी होऊ शकते. 

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स-

१) हर्बल टी-

वेट लॉस करण्यासाठी सकाळच्या वेळेस दुधाच्या चहा ऐवजी तुळस, अदरक तसेच काळी मिरी आणि गुळ इलायची मिश्रित 'हर्बल टी'चे सेवन करावं.  यामुळे तणाव कमी होऊन मुडही फ्रेश राहतो. 

२) प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट-

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी ब्रेकफास्टमध्ये डोसा, मुगडाळ, बेसन आदी एक ग्लास दुधात मिक्स करून त्याचं सेवन केलेलं चांगलं ठरतं.

३) लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी जैविक घडीचे अनुसरण करा. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात. त्यामुळे चयापचयाच्या क्रिया चांगल्या राहतात. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित अनुसरण केल्यास निश्चित वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल व आपले आरोग्य चांगले राहण्यास उपयोगी ठरेल.

हे खाणे टाळा-

तेलकट, खारवलेले पदार्थ, रेडी टू इट, बेकरी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम, मद्यपान हे टाळावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सLifestyleलाइफस्टाइल