खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, जंक फूड खाण्याची सवय आणि वर्कआउट न करणे यामुळे वजन वाढतं. सोबतच ही समस्या आनुवांशिकही असू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक मोठी मेहनत घेतात. तरी सुद्धा त्यांना वजन कमी करण्यात फार काही मदत होत नहाी. तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करायचं असेल तर आधी वजन संतुलित करणं फार गरजेचं आहे. कारण लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंग करू लागतात. ज्यात रोज लोक उपाशी राहतात.
पण उपाशी राहून वजन कमी होत नाही. उलट कमजोरी वाढते. वाढत्या वजनाला कमी करायचं असेल तर यासाठी आधी वजन संतुलित करा. एकदा जर तुमचं वजन संतुलित झालं की, मग हळूहळू डाएटमध्ये बदल करून कमी वजन कमी करू शकला. सोबत एक्सरसाइजही यासाठी गरजेची आहे. यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की एका आठवड्यात किती एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे माहीत नसेल तर जाणून घेऊया..
अनेक रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, वजन कमी करण्यासाठी वर्कआउट गरजेचा आहे. याने कॅलरी बर्न होतात. कॅलरीज इनटेक जेवढं करता तेवढी एक्सरसाइज केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, रोज एका ठराविक वेळेत एक्सरसाइज करा. याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका आठवड्यात अर्धा किलो वजन कमी करण्यासाठी ३ हजार कॅलरीज बर्न कराव्या लागतात. यासाठी वर्कआउटही अधिक करावा लागतो. तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी ३ हजार कॅलरीज बर्न करण्यासाठी रोज एक तास आणि आठवड्यातून ३०० मिनिटे एक्सरसाइज करण्याची गरज आहे.
सोबतच International Journal of Cancer मध्ये प्रकाशित रिसर्चमधून खुलासा झाला आहे की, सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजेदरम्यान एक्सरसाइज केल्याने ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. असं होण्याचं कारण म्हणजे एस्ट्रोजन हार्मोन सकाळी ७ वाजता उच्च स्तरावर राहतो. एस्ट्रोजन एक हार्मोन आहे जो ब्रेस्ट कॅन्सरच्या कोशिका सक्रिय करतो. याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
(टिप : या लेखातील टिप्स आणि सल्ले हे केवळ माहितीसाठी आहेत. याकडे डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल्सचा सल्ला म्हणून बघू नका. यात दिलेल्या माहितीचा आम्ही कोणताही दावा करत नाही. ही केवळ रिसर्चमधून समोर आलेली माहिती आहे. वजन कमी करण्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)