Weight Loss Tips : जर आम्ही तुम्हाला विचारलं की, वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं? तर तुमची उत्तरं साहजिकच रनिंग, डाएट, जॉगिंग, एक्सरसाइज, जिम अशी वेगवेगळी असतील. पण आम्ही तुम्हाला सांगतोय की, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे काहीही न करता तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. विश्वास नाही बसत ना?
भरपूर झोप घ्या स्लिम व्हा
ही बाब अगदी बरोबर आहे. कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं शरीर रिपेअरिंग मोडमध्ये राहतं. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांच्या शरीराचं सिस्टीम पूर्णपणे डिस्टर्ब होतं. हार्मोन्समध्येही असंतुलन होतं. ज्याचा परिणाम आपल्याला जाडेपणातून बघायला मिळतो. अशात आता रात्री उशीरापर्यंत फोनवर बोलणं, टीव्ही बघत बसणं बंद करा. भरपूर झोप घ्या आणि शरीराची सिस्टीम फिट ठेवा.
चांगल्या झोपेने बर्न होतात २० टक्के कॅलरी
जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीराच्या सामान्य प्रक्रिया सुरूच असतात. शरीराच्या या सामान्य प्रक्रिया सुरूच ठेवण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी शरीरातील कॅलरी बर्न करण्यास मदत करते. अशात तुमची झोप जेवढी चांगली होईल तितक्या जास्त कॅलरी बर्न होतील. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, जे लोक चांगली झोप घेतात ते कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत २० टक्के कमी कॅलरी बर्न करतात.
निर्वस्त्र होऊन झोपा
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अॅन्ड ह्यूमन डेव्हलेपमेंट, मेरीलॅंड आणि स्टॅनफर्ड यूनिव्हर्सिटीकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जर रात्री तुमची झोप उकाड्यामुळे व्यवस्थित होत नसेल तर तुमचं शरीर सामान्यापेक्षा जास्त कोर्टिसोल रिलीज करतं. यामुळे तुमची भूक वाढते. याचाच परिणाम म्हणजे तुमचं वजन वाढतं. तेच जर तुम्ही कमी कपड्यात किंवा निर्वस्त्र होऊन झोपाल तर शरीर थंड राहणार आणि याने फॅट बर्न होणार. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
रात्री उशीरा खाणे टाळा
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचं रात्रीचं जेवण ७ किंवा ८ वाजता करत असाल अर्थातच तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागी राहणार असल्याने तुम्हाला पुन्हा भूक लागणार. आणि तुम्ही पुन्हा रात्री काहीतरी खाणार. यूनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियाच्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही सतत एक आठवडा रात्री उशीरा काही खात असाल तर तुमचं वजन १ किलो ग्रॅमपर्यत वाढू शकतं. त्यामुळे लवकर झोपा आणि रात्री उशारी काही खाणे बंद करा.